Wednesday, August 20, 2025 10:17:32 AM

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार; दहावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट

SSC परीक्षेचा निकाल 15 मे 2025  पूर्वीच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्य मंडळाने मे अखेरीस निकाल जाहीर केला होता

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार दहावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार जाणून घ्या संपूर्ण अपडेट

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या SSC (दहावी) परीक्षेचा निकाल कधी लागणार, याकडे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाच्या तारखेची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे.
या वर्षी दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025  पासून सुरू झाली होती आणि मार्च महिन्यात यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष एकाच गोष्टीकडे –निकाल कधी लागणार?

मिळालेल्या माहितीप्रमाणे, यंदा SSC परीक्षेचा निकाल 15 मे 2025  पूर्वीच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्य मंडळाने मे अखेरीस निकाल जाहीर केला होता, परंतु यंदा निकालाच्या प्रक्रियेला वेग दिला गेला असून हा राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल ठरू शकतो, असं सांगितलं जात आहे. राज्यभरात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत मिळाव्यात यासाठीच यंदा मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर केलं. त्यानुसार निकालही मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच जाहीर करण्याचा मानस आहे. यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

मात्र, एवढ्या चर्चांनंतरही राज्य मंडळाकडून अधिकृत निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी फसवणूक करणाऱ्या अफवांपासून दूर राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री