Sunday, August 31, 2025 04:06:39 PM

PM Kisan Yojana: छत्रपती संभाजीनगरमधील आठ हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून वंचित; नेमकं कारण काय?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी वंचित आहेत. ई-केवायसी नसल्याने हप्त्याचं वितरण थांबवलं आहे.

pm kisan yojana छत्रपती संभाजीनगरमधील आठ हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून वंचित नेमकं कारण काय

छत्रपती संभाजीनगर: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी वंचित आहेत. ई-केवायसी नसल्याने हप्त्याचं वितरण थांबवलं आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगरातील साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 वा हप्ता जमा झाला आहे. मात्र, तरीही ई-केवायसी, आधार सीडिंग प्रक्रिया प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. ऑगस्ट महिन्यात देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 हप्ता मिळाला आहे. 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळाला होता. त्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर 20 हप्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाला. परंतु छत्रपती संभाजीनगरातील आठ हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. 

हेही वाचा: Mumbai Rain Update: आज मुंबईत हवामान कसे असेल? जाणून घ्या नवीन अपडेट

लाभ न मिळण्याची कारणं ? (PM Kisan Sanman Yojana)
1. कागदपत्रं अपूर्ण किंवा चुकीच्या नोंदी
2. आधार मोबाईल नंबरशी लिंक नसणं
3. बँक खातं आधारशी जोडलेलं नसणं
4. चुकीचा बँक खाते क्रमांक नोंदवणं
5. पात्रता निकष पूर्ण नसणं
6. तांत्रिक अडचणी, पोर्टलमधील त्रुटी

आठ हजार शेतकरी किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 वा हप्ता जमा झाला आहे. मात्र, तरीही ई-केवायसी व आधार सीडिंग प्रक्रिया प्रलंबित असलेल्या 7 हजार 961 शेतकऱ्यांना अद्याप या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. केंद्र सरकारच्या 'पीएम किसान सन्मान' योजनेचा लाभ जिल्ह्यातील 3 लाख 60 हजार 499 शेतकरी घेत आहेत. पीएम किसान योजनेत वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात.

तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना 20 वा हप्ता नुकताच वितरित केला असून, जिल्ह्यातील 7 हजार 961 शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार सीडिंग न केल्यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. अनेकवेळा आवाहन करुनही अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याचे समोर आले आहे.


सम्बन्धित सामग्री