Wednesday, August 20, 2025 04:32:18 AM

Khed Accident: खेडमधील अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

khed accident खेडमधील अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

Pune Accident: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात सात महिला भाविकांचा मृत्यू झाला. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. हा दुर्दैवी अपघात सोमवारी दुपारी सुमारे 1:30 वाजता घडला. पापळवाडी गावातून श्री क्षेत्र कुंडेश्वर मंदिराकडे भाविकांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन घाटातील उतारावरून जात असताना खोल दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक भाविक गंभीर जखमी झाले. मृतांपैकी बहुतेक महिला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट - 

हेही वाचाKhed Accident: खेडमध्ये भीषण अपघात! भाविकांना घेऊन जाणारा पिकअप दरीत कोसळला; 7 महिलांचा मृत्यू

अपघातानंतर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सात जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा - Dahi Handi Festival 2025: दहीहंडी सरावादरम्यान 11 वर्षीय गोविंदाचा उंचीवरून पडून मृत्यू

श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. विशेषतः श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर सोमवारी भाविकांचा हा समूह पापळवाडी गावातून कुंडेश्वर मंदिराकडे जात होता. यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिकांनी वाहतुकीसाठी आणि यात्रेसाठी अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
 


सम्बन्धित सामग्री