Wednesday, August 20, 2025 04:30:01 AM

नागपूर कारागृहात कैद्याची आत्महत्या; अंतर्वस्त्राच्या इलास्टिकने घेतला गळफास

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कैद्याने आपल्या अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून खिडकीला गळफास घेतला.

नागपूर कारागृहात कैद्याची आत्महत्या अंतर्वस्त्राच्या इलास्टिकने घेतला गळफास
Prisoner Suicide In Nagpur Central Jail प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

नागपूर: नागपूरमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कैद्याने आपल्या अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून खिडकीला गळफास घेतला. मृत कैद्याचे नाव तुळशीराम शेंडे (वय 54) असून तो गोंदिया जिल्ह्याचा रहिवासी होता.

भंडारा खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा - 

तुळशीराम शेंडे याला 30 जून 2024 रोजी भंडारा येथील खून प्रकरणात दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. बुधवारी तो 'रंग काम विभाग' या गोदामाच्या मागे असलेल्या खिडकीला लटकलेला आढळून आला.

हेही वाचा -हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या, नातेवाईकांचा संताप; प्रेत 18 तास पोलीस ठाण्यातच

पोलिसांकडून तपास सुरू - 

दरम्यान, घटनेची माहिती तुरुंग प्रशासनाने तात्काळ धंतोली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तुरुंगात कैद्यांकडून होणाऱ्या आत्महत्या ही एक गंभीर आणि सातत्याने वाढत असलेली समस्या मानली जात आहे. 

हेही वाचा - महादेव मुंडे हत्या प्रकरण: पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातच घेतलं विष

राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) आणि विविध न्यायिक समित्यांच्या अहवालांनुसार, तुरुंगात होणाऱ्या अनैसर्गिक मृत्यूंचे सर्वात मोठे कारण आत्महत्या आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, 2017 ते 2021 दरम्यान भारतात 817 अनैसर्गिक मृत्यू झाले, त्यापैकी 80 % म्हणजेच 660 आत्महत्या होत्या. या काळात उत्तर प्रदेशात सर्वाधिक 101 कैद्यांनी आत्महत्या केली. विशेष बाब म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांपैकी मोठ्या संख्येने अंडरट्रायल म्हणजेच खटला सुरू असलेले कैदी होते. अशा घटनांमुळे तुरुंगांमधील मनोवैज्ञानिक सुविधा, सुरक्षा आणि देखरेखीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री