Wednesday, August 20, 2025 09:47:10 AM

राज्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय.

राज्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

मुंबई: राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय. राज्यातील विविध ठिकाणी देखील हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. 

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात देशभरातून आलेले शिवभक्त पारंपरिक, शिवकालीन वेश परिधान करून सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील शेलगाव येथून आलेला शिवप्रेमी शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून रायगडावर वावरतो आहे. हा वेश परिधान केल्यानंतर छाती गर्वाने फुगते असं तो सांगतो. येथे आलेले हलगी पथक देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हलगीच्या तालावर शिवप्रेमी या ठिकाणी नाचत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील बुऱ्हाणपूर येथून हलगी पथक गेली अनेक वर्षे राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येत असते. या पथकामध्ये बहुतांश बुजुर्ग मंडळी आहेत. मात्र त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.

हेही वाचा: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी

नागपुरातील शिवाजी पुतळा चौक,शिवतीर्थ महाल येथे शिवराज्याभिषेक सुरू असून यावेळी अनेक शिवप्रेमी सहभागी झाले. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352 व्या राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यासोबतच हा राज्याभिषेक सोहळा नाचून नाहीत तर वाचून साजरा करायचा आहे यासाठी शिवचरित्राचे पारायण करण्यात आले.


सम्बन्धित सामग्री