Sunday, August 31, 2025 11:46:49 AM

ST Bus travel concession : प्रताप सरनाईकांचं वक्तव्य; एकनाथ शिंदेंचा पूर्णविराम

एकीकडे चर्चा सुरु होती की राज्यतील महिलांचा एसटी सवलत सवलत रद्द करण्यात येणार मात्र आता या चर्चेला पूर्णविराम देण्यात येत आहे.

st bus travel concession  प्रताप सरनाईकांचं वक्तव्य एकनाथ शिंदेंचा पूर्णविराम

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने अनेक योजनांची घोषणा केली. आणि त्या योजना राबवल्या सुद्धा. त्याचवेळी म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी  महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळाच्या बसच्या प्रवासासाठी 50 टक्के सवलत अर्थात अर्धे तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही सवलत आताही महिलांना मिळते. तसेच जेष्ठ नागरिकांना देखील एसटी प्रवासात सवलत देण्यात येते. 

हेही वाचा: Mere Husband Ki Biwi Movie Review : प्रेम, कॉमेडी सोबतच दमदार अभिनय

मात्र या संदर्भांत  राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठं विधान केलं होत. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेली असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं त्यांच्या या विधानाने सर्वत्र चर्चेला उधाण आलं. मात्र आता या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय. 

एकीकडे चर्चा सुरु होती की राज्यतील महिलांचा एसटी सवलत सवलत रद्द करण्यात येणार मात्र आता या चर्चेला पूर्णविराम देण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र सोबत  बोलताना सांगितले आहे की  ST प्रवासात महिला आणि जेष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही. प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार असे देखील आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत . अनेक योजना या बंद होत आहेत असे चर्चा असताना एसटी प्रवासाबद्दल देखील संभ्रम होतात तो आता मिटला आहे.


सम्बन्धित सामग्री