मुंबई : मत्यव्यवसाय मंत्री नितेश राणे सध्या चर्चेत आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हते. शिवरायांची लढाई हिंदू-मुसलमान अशीच होती असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्याने नवा वाद समोर आला आहे.
शिवरायांचे शूर मुस्लिम मावळे
महाराजांच्या अंगरक्षकांत तीन मुसलमान सरदारांचा समावेश होता. सरदार नूर खान, सिद्दी इब्राहिम आणि सुलतान अशी त्यांची नावं आहेत. शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदारांचा समावेश होता. त्यातील नूर खान बेग हे शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख होते. सिद्दी इब्राहिम, सिद्दी जोहर, मसूद खान, अंबर वहाब, शमा खान, इब्राहिम पठाण, दाऊद खान, हुसेन खान, जाफर खान यांचाही समावेश होता. महाराजांच्या सैन्यातील तोफखाना बहुतेक मुस्लिम सैनिकांचा होता. इब्राहिम खान हा तोफखान्याचा मुख्य होता. शमा खान, इब्राहिम खान हे घोडदळ पथकाचे प्रमुख होते.
हेही वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार
महाराजांचं मुस्लिमांबद्दल धोरण
शिवराय सर्व धर्मांचा सन्मान करायचे. महाराजांचा लढा औरंगजेबाविरुद्ध आणि स्थानिक हिंदू राजांविरुद्धही होता. औरंगजेबच्या सेनेचं नेतृत्व रजपूत असलेल्या राजा जयसिंहकडे होतं. शिवरायांच्या प्रशासनातलं मानवतेचं धोरण धर्माधारीत नव्हतं. लष्कर, नौसेनेत नियुक्तीसाठी धर्म हा निकष नव्हता. त्यातले एक तृतीयांश सैनिक मुस्लीम होते. नौसेनेची धुरा सिद्दी संबलच्या हाती होती. त्यांच्या नौसेनेत सिद्दी मुस्लीम मोठ्या संख्येने होते.