Sunday, August 31, 2025 02:20:52 PM

शिंदेंच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी; दोन जण ताब्यात

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मिळाली होती. या धमकीने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.

शिंदेंच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी दोन जण ताब्यात

महाराष्ट्र: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मिळाली होती. या धमकीने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. अज्ञात व्यक्तीने मेलद्वारे ही धमकी दिल्याचं समोर आलं होत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याऱ्या धमकीचा ई-मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीनं पाठवला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. मुंबईतल्या जवळपास 7-8 पोलीस ठाण्यात आणि इतर विभागात हा मेल पाठवण्यात आला होता. यानंतर पोलिसांकडून ई-मेल नेमका कुणी पाठवला होता याचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडून घेण्यात येत होता. त्यानंतर आता यासंदर्भात दोन जणांना अटक करण्यात आलीय. 

ST Bus travel concession : प्रताप सरनाईकांचं वक्तव्य; एकनाथ शिंदेंचा पूर्णविराम

बुलढाणा जिल्ह्यातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून धक्कादायक म्हणजे हे दोघे भाऊ असल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला असतांना हा धक्कादायक मेल पोलिसांना मिळाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले होते. आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना आरोपी बुलढाण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई एटीएस आणि बुलढाणा पोलिसांनी देऊळगावमधून कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतलं. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे असं या आरोपींचे नाव आहे. हे दोघेही ट्रक चालक असून, त्यांनी अभय शिंगणे याच्या मोबाईलच्या दुकानातून धमकीचा ई-मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याऱ्या धमकीचा ई-मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीनं पाठवला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून या दोघे भावांना बुलढाण्यातून ताब्यात घेतलंय. 


सम्बन्धित सामग्री