Sunday, August 31, 2025 04:33:08 PM

परबांच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ; काय म्हणाले अनिल परब?

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.

परबांच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ काय म्हणाले अनिल परब

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. परबांच्या वक्तव्यामुळे सर्वांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझा छळ झाला असे वक्तव्य आमदार परब यांनी केले आहे.

शंभूराजे माझ्यासाठी दैवत, त्यांचा अपमान करणार नाही

संभाजी राजेंशी स्वत:ची तुलना करुच शकत नाही. सोलापूरकरांचं वक्तव्य झाकण्यासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे असे अनिल परब यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. परबांच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ निर्माण झाला. यावर बोलताना चुकीचं बोललो असले तर अध्यक्षांना सर्व अधिकार आहेत. माझ्या शब्दांवर आक्षेप असेल तर शब्द काढून टाका अशी भूमिका परबांनी घेतली आहे. शंभूराजे माझ्यासाठी दैवत, त्यांचा अपमान करणार नाही असेही आमदार परब यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का; मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी

अनिल परबांना नेमकं काय छळलं?

आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संजय शिरसाट यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. संभाजीराजेंसोबत स्वत:ची तुलना करणारे अनिल परब इतके मोठे झाले का? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे. तसेच अनिल परबांना नेमकं काय छळलं? परबांचे डोळे काढले की नखं काढली? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अनिल परबांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला असून आम्ही परबांचा धिक्कार करतो असे वक्तव्य दरेकरांनी केले आहे. तसेच अनिल परबांचं निलंबन करा अशी मागणी परिणय फुके यांनी केली.  

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून गुरूवारी विधानपरिषदेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आपली तुलना संभाजी महाराजांबरोबर केली आहे. या वक्तव्यावरुन सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. परबांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. परबांच्या निलंबनाची मागणी देखील सत्ताधाऱ्यांकडून होत आहे.


सम्बन्धित सामग्री