Weekly Horoscope: या आठवड्यात सूर्य मिथुन राशीत असून मंगळ-कुंभ योग आणि शुक्र-वृषभच्या प्रभावामुळे अनेक राशींना नवीन संधी, बदल व आत्मचिंतनाचा कालखंड अनुभवता येईल. चला तर पाहूया तुमच्या राशीचं भविष्य.
♈ मेष (ARIES): या आठवड्यात व्यावसायिक क्षेत्रात मोठे निर्णय घ्यावे लागतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी जिंकल्यास पुढे वाट खुली होईल. आर्थिक गुंतवणूक करताना धाडस करावे लागेल. कौटुंबिक जीवनात मतभेद होऊ शकतात, पण संवाद ठेवल्यास स्थिती सुधारेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषतः थकवा व डोकेदुखी त्रास देऊ शकतात.
शुभ दिन: सोमवार
शुभ रंग: लाल
उपाय: रोज सकाळी हनुमान चालीसा पठण करा.
♉ वृषभ (TAURUS): शुक्राच्या प्रभावामुळे आर्थिक क्षेत्रात नवे लाभ मिळतील. नवीन वाहन खरेदीसाठी चांगला काळ आहे. शिक्षणात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदी क्षण येतील. मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक विशेषतः गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा.
शुभ दिन: गुरुवार
शुभ रंग: पांढरा
उपाय: देवी लक्ष्मीची रोज पूजा करा.
हेही वाचा: Budh Gochar 2025: 22 जूनपासून बदलणार नशिबाचा खेळ; बुध गोचरमुळे ‘या’ 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव
♊ मिथुन (GEMINI): सूर्य आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. निर्णयक्षमता उत्तम राहील. नवे प्रोजेक्ट्स सुरू करण्यास हा काल उत्तम आहे. मित्रपरिवारासोबत वेळ घालवताना जुने मतभेद विसरावेत. प्रेमसंबंधात थोडी घसरण जाणवू शकते, संवाद ठेवा.
शुभ दिन:बुधवार
शुभ रंग: हिरवा
उपाय: बुध ग्रहासाठी बुधवारचा उपवास करा.
♋ कर्क (CANCER): या आठवड्यात आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल. गुरु-चंद्र युतीमुळे मन एकाग्र राहील. कामात स्थिरता येईल पण मोठ्या निर्णयांपासून सध्या थोडं लांब राहा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याच्या दृष्टीने मध्यम आठवडा आहे.
शुभ दिन: रविवार
शुभ रंग: चंदेरी
उपाय: गायीला गूळ व रोटी द्या.
♌ सिंह (LEO): कार्यक्षेत्रात नवे संधी मिळतील. नेतृत्वाची संधी मिळेल. सीनियर व्यक्तींची साथ लाभेल. आर्थिक व्यवहारात लाभ मिळेल. वैवाहिक जीवनात सौहार्द राहील. मात्र अहंकारामुळे संबंध बिघडू शकतात. लहान भावंडांसोबत संवाद ठेवा.
शुभ दिन:मंगळवार
शुभ रंग: केशरी
उपाय: सूर्यनमस्कार नियमित करा.
हेही वाचा:Pandharpur Wari 2025 Wishes: खास शुभेच्छा, प्रेरणादायी कोट्स आणि महत्वाची माहिती
♍ कन्या (VIRGO): विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचा काळ. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल. नोकरीत बढती किंवा नवी संधी मिळू शकते. जुने कर्ज फेडण्याचा योग आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान व प्राणायामाचा लाभ घ्या.
शुभ दिन:शनिवार
शुभ रंग: करड्या रंगाचा शेड
उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा.
♎ तुला (LIBRA): व्यवसायात जोखीम पत्करावी लागेल, पण नफा संभवतो. नविन भागीदारीसाठी काळ अनुकूल. कौटुंबिक वातावरणात सौहार्द राहील. घरात मंगलकार्याची चर्चा होईल. आरोग्य सुधारेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दिन: शुक्रवार
शुभ रंग: निळा
उपाय: शुक्रवारच्या दिवशी गरीब स्त्रीस वस्त्र दान करा.
♏ वृश्चिक (SCORPIO): मंगळ तुमच्या राशीला साथ देत असल्यामुळे नवे काम सुरू करण्यास अनुकूल काळ आहे. पण रागावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये स्पर्धा वाढेल, मात्र आपण पुढे राहाल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. ध्यान करणे फायदेशीर ठरेल.
शुभ दिन: मंगळवार
शुभ रंग: मरून
उपाय: मंगलवारी भाकरीवर गूळ ठेवून कुत्र्याला खाऊ द्या.
♐ धनु (SAGITTARIUS): शिक्षण, प्रवास आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. पिता किंवा गुरुंचा सल्ला लाभदायक ठरेल. आयुष्यात दिशा मिळेल. कार्यात वाढीव जबाबदारी येईल. कौटुंबिक सौख्य मिळेल. थोडेसे मानसिक ताण जाणवेल, पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
शुभ दिन: गुरुवार
शुभ रंग: पिवळा
उपाय: गुरुवारी वडीलधाऱ्यांना पाय धरून आशीर्वाद घ्या.
♑ मकर (CAPRICORN): कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. नियोजन केल्यास उत्तम यश मिळेल. जुनी गुंतवणूक फायदा देईल. कौटुंबिक वाद मिटतील. आरोग्य उत्तम राहील. भावनांवर नियंत्रण ठेवा, प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील.
शुभ दिन: शनिवार
शुभ रंग: काळा
उपाय: शनिवारी पीपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला.
♒ कुंभ (AQUARIUS): सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. सन्मान मिळेल. राजकीय क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ. घरात काही खर्च वाढेल पण त्याचा उपयोग दीर्घकालीन असेल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. नविन नाती जुळतील.
शुभ दिन: रविवार
शुभ रंग: जांभळा
उपाय: झाडांना पाणी द्या, विशेषतः रविवारच्या दिवशी.
♓ मीन (PISCES): सतत प्रवासाचे योग संभवतात. मानसिक थकवा जाणवेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. जोडीदाराशी सहकार्य करा. विद्यार्थ्यांना नवे मार्ग सापडतील. आध्यात्मिक साधनेसाठी हा काळ उत्तम आहे.
शुभ दिन: सोमवार
शुभ रंग: आकाशी
उपाय: सोमवारच्या दिवशी शिव मंदिरात बेलपत्र अर्पण करा.
या आठवड्यात ग्रहांची चाल बदलत असल्यामुळे अंतर्मुखतेकडे झुकण्याचा काळ आहे. प्रत्येक राशीला आत्मचिंतन, संवाद आणि संयम आवश्यक आहे. कुठल्याही निर्णयाआधी विचार करा आणि भावनेच्या भरात कृती टाळा.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)