Sunday, August 31, 2025 04:31:14 PM

Sunday Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मोठा मेगाब्लॉक, लोकल प्रवासावर होणार परिणाम

24 ऑगस्ट 2025 रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून माटुंगा- मुलुंड व ठाणे- वाशी दरम्यान लोकल वाहतूक प्रभावित होईल. देखभाल व दुरुस्ती कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सां

sunday megablock मुंबईकरांनो लक्ष द्या रविवारी मध्य रेल्वेवर मोठा मेगाब्लॉक लोकल प्रवासावर होणार परिणाम

Central Railway Megablock: मुंबईकरांसाठी रविवारी रेल्वे प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने 24 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. पायाभूत सुविधा सुधारणा आणि ट्रॅक देखभाल कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, माटुंगा- मुलुंड आणि ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

माटुंगा- मुलुंड मार्गावरील ब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 15.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.14 ते दुपारी 15.32 दरम्यान सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.

हेही वाचा: Flower Rate In Ganeshotsav 2025 : ऐन गणेशोत्सवात फुलं महागणार ? जाणून घ्या अपेक्षित दर

या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकावर पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. यामुळे या गाड्या गंतव्यस्थानी पोहोचताना साधारणपणे 15 मिनिटे उशीर होणार आहे.

तसेच, ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 15.51 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावरून अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबतील. माटुंगा स्थानकापासून त्या पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्याही त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा अंदाजे 15 मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत.

ठाणे- वाशी/नेरुळ ट्रान्स-हार्बर मार्गावरील ब्लॉक

मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावरही प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायं. 16.10 वाजेपर्यंत अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर गाड्या बंद राहतील.या काळात ठाणे येथून सकाळी 10.35 ते दुपारी 16.07 पर्यंत सुटणाऱ्या वाशी / नेरुळ / पनवेलकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी 10. 25 ते दुपारी 16.09 पर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्याही रद्द राहतील.

हेही वाचा: Zero Toll Tax: आनंदाची बातमी! 'या' पुलावर टोल पूर्णपणे फ्री; फक्त 'या' वाहनांनाच मिळणार सूट

प्रशासनाची विनंती

रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की, हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधा देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

रविवारी नियोजित या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांवर परिणाम होणार आहे. कामकाजाच्या सुरळीततेसाठी प्रवाशांनी आगाऊ नियोजन करून प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे रेल्वे सेवा अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


सम्बन्धित सामग्री