Independence Day Wishes & Quotes in Marathi: स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
मुंबई: 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. यादिवशी अनेकजण आपल्या प्रियजनांना स्वातंत्र्यदिनानिमित्त खास शुभेच्छा देतात.
या दिवशी अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर आणि बलिदानानंतर अखेर ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे, भारतीयांच्या हृदयात स्वातंत्र्य दिनासाठी विशेष महत्त्व आहे. हा दिवस स्वातंत्र्याचा विजय, सैनिकांचा संघर्ष आणि देशभक्तीची भावनाही दर्शवितो.
चला तर सविस्तर जाणून घेऊया स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवितो माथा, स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा !
गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा! जय जवान जय किसान, स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा !
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश महान बनला, स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा !
उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला , नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला, स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा !
रंग, रूप, वेश, भाषा अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !
सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली, जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !
मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे, स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा !