Sunday, August 31, 2025 09:01:22 PM

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

manikrao kokate   माणिकराव कोकाटेंच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी

मंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. नाशिक येथील न्यायालयाने गुरुवारी राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना सरकारी कोट्यात फ्लॅट मिळवण्यासाठी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या 30 वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. माजी मंत्री दिवंगत टी.एस. दिघोळे यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू न्यायालयाने बाजू ऐकून घेतली. त्यानंतर आज कोर्टातील मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीचा निर्णय लांबणीवर गेला आहे. आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर १ मार्च रोजी फैसला होणार आहे. यामुळे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार की राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

हेही वाचा:  Dhananjay Munde in Trouble: धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात

काय आहे नेमकं प्रकरण? 

माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांना येवलाकर माळा येथील कॉलेज रोडवर मुख्यमंत्रीपदाच्या 10 टक्के विवेकाधीन कोट्याअंतर्गत दोन फ्लॅट मिळाले होते. त्यांच्याकडे फ्लॅट नसल्याचा आणि ते कमी उत्पन्न गटातील (एलआयजी) असल्याचा दावा करून दिघोळे यांनी त्यावेळी पोलिसांकडे अनियमिततेचा आरोप केला होता. त्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात कोकाटे भावंड आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत फसवणूक, बनावटगिरी आणि इतर गुन्ह्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू न्यायालयाने बाजू ऐकून घेतली. त्यानंतर आज कोर्टातील मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीचा निर्णय लांबणीवर गेला आहे. आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर १ मार्च रोजी फैसला होणार आहे. यामुळे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार की राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 


 


सम्बन्धित सामग्री