Wednesday, August 20, 2025 07:37:26 AM

Raj Thackeray: मला लाज वाटते, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांचं आवाहन

राज ठाकरे यांनी रायगड मेळाव्यात मराठी अस्मिता, परप्रांतीय अतिक्रमण आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला; भाषणात अनेक मुद्दे गाजले.

raj thackeray मला लाज वाटते महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांचं आवाहन

 

Raj Thackeray: शेतकरी कामगार पक्षाच्या रायगडमधील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत निशाणा साधत मराठी अस्मितेचा प्रखर आवाज उठवला. संजय राऊत आणि राज ठाकरे एकाच मंचावर असल्याने या मेळाव्याला राजकारणात वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. मराठी माणसाच्या अस्मितेचा, भाषेचा आणि भूमिपुत्रांच्या अधिकाराचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर थेट सवाल उभा केला. 'महाराष्ट्रात मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही,' असा ठाम इशारा देत ठाकरे यांनी सरकारच्या मराठी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढण्याची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. 

परप्रांतीय ते अर्बन नक्षलवाद, राज ठाकरे यांनी शेकापचा मेळावा गाजवला

-बाहेरच्या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील लोकांना विकत घेता येणारी माणसं (Purchasable Community) असं म्हटलं जात. 

-सर्वात जास्त डान्स बार रायगड जिल्ह्यात आहेत. 

-छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे कशाला ठेवायचे?

-महाराष्ट्र विकून मोठे होऊ नका. 

-अल्पेश ठाकूर यांनी गुजरातमधील बिहाऱ्यांना हाकलवून दिलंय. 

-राज ठाकरे बोलतात तेव्हा ते संकुचित भ्रष्टाचारी नेते कसे ठरतात. 

-देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. 

-गुजरातमध्ये आपल्याला जमीन घेता येत नाही. 
 
-निवडणुकीच्या वेळी पैसे देणार आणि मत विकत घेणार; एवढाच कारभार महाराष्ट्रात चालू आहे. 

-महाराष्ट्रात गुजराती भाषा संमेलन. 

-आम्हाला जे हवं तेच आम्ही करणार; तुम्हाला वाटत ते आम्ही करणार नाही. 

 


सम्बन्धित सामग्री