साडेसाती म्हटल्यावर आपल्याला आठवते शनी देव आणि त्यांची वक्रदृष्टी. शनीच्या प्रकोपातून वाचण्यासाठी अनेकजण त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. दर शनिवारी शनिदेवांना तेल चढवणे, त्यांच्या प्रकोपातून लांब राहण्यासाठी अनेकजण मारुतीरायांची पूजादेखील करतात. मात्र कितीही प्रयत्न केले तरी लोकांना त्यांच्या प्रकोपातून वाचता येणे अवघड असते. अशातच, 29 मार्च हा दिवस असा आहे जेव्हा शनि आणि राहू असे दोन्ही ग्रह एकत्र येतील. 29 मार्च रोजी शनी स्वतःची कुंभ राशी सोडून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. मीन राशी गुरुची राशी आहे. राहूने ऑक्टोबर 2024 मध्ये मीन राशींत प्रवेश केले. त्यामुळे शनी आणि राहूच्या एकत्र येण्यामुळे अनेक राशींमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असेल. शनी आणि राहू यांच्या एकत्र येण्यामुळे शनीची साडेसाती असलेल्या राशींवर खास प्रभाव पडेल. खासकरून मीन, मेष, कुंभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना काही प्रमाणात अडचणी येतील. या राशीच्या लोकांना जास्त सावध राहण्याची गरज आहे. खरंतर 29 मार्चला शनीची साडेसाती मेष राशीवर सुरु होईल. कुंभ आणि मीन राशीवर आधीपासूनच साडेसाती सुरु आहे. मात्र मकर राशीचे लोक साडेसातीपासून मुक्त होतील.
हेही वाचा: Holi 2025: होलिका दहनात भद्राची सावली, मध्यरात्री फक्त 1 तास 4 मिनिटांचा शुभ मुहूर्त
शनीची साडेसाती असलेल्या राशींनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
शनीची साडेसाती असलेल्या राशींनी काही गोष्टींबद्दल विशेष लक्ष द्यायला पाहिजे. या राशीच्या लोकांनी अपघातापासून सावध करण्याची गरज आहे. अशा कोणत्याही जागी जाण्यास टाळा जिथे तुम्हाला धोका वाटत आहे. या काळात व्यवसायात किंवा पैश्यांसंबंधित निर्णय घेताना काळजी घ्या आणि संशोधन करून घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला विचार करूनच योग्य ते निर्णय घ्यावे लागेल. कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करून घ्या आणि गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. शनीला प्रसन्न करण्यासाठी गरिबांची सेवा करा, घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. शनिवारी आपल्या घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत बसून रात्रीचे 8 वाजता मोहरीच्या तेलाचा दिवा लावून 108 हनुमान चालीसाचे पठण करावे. प्रसादाचे नैवेद्य दाखवा.
राहुकाळात कोणत्या गोष्टी करू नये?
राहुकाळात कोणतेही काम करू नये. सूर्य आणि मंगळला मजबूत करण्यासाठी विविध उपाय करा. कितीजरी महत्वाची कामे असतील तरीदेखील घराच्या बाहेर पडू नका.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)