Wednesday, August 20, 2025 09:16:23 AM

Gajkesari Rajyog : गजकेसरी राजयोगामुळे 5 मार्चनंतर मिळेल पैसाच पैसा; अचानक धनलाभासह 'या' राशींचे नशीब चमकणार

Gajkesari Rajyog: या राजयोगमुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींच्या पगारात वाढ होऊ शकते. करीअरमध्ये प्रगती होऊ शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

gajkesari rajyog  गजकेसरी राजयोगामुळे 5 मार्चनंतर मिळेल पैसाच पैसा अचानक धनलाभासह या राशींचे नशीब चमकणार

Gajkesari Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाला समृद्धी आणि मान सन्मानाचा कारक मानले जाते. तसेच चंद्राला मनाचा कारक मानले जाते. गुरू ग्रह आता वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. तसेच, चंद्र 5 मार्च रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग हा एक शुभ आणि शक्तिशाली योग मानला जातो. हा योग गुरु आणि चंद्राच्या युतीने तयार होतो.

गजकेसरी योग कसा तयार होतो?
गुरु आणि चंद्र एकाच राशीत एकत्र आल्याने गजकेसरी योग होतो. गुरु ज्या राशीत असेल त्या राशीपासून चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात चंद्र असतो, तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. चंद्राचा गुरु ग्रहासह मध्य स्थानात म्हणजेच आरोही, चतुर्थ आणि दहावा भाव असेल तर हा योग तयार होतो.

हेही वाचा - 164 वर्षांनंतर शुक्र-नेपच्यूनने निर्माण केला शक्तिशाली राजयोग; या राशीचे लोक जगतील चैनीत, मिळणार भरपूर पैसा

गजकेसरी योगाचे फायदे
हा योग शिक्षण, करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यास मदत करतो. या योगावर जन्मलेले लोक बुद्धिमान, आध्यात्मिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. या योगाचे लोक गुणवान, ज्ञानी आणि उत्तम गुणांचे असतात. या योगाचे लोक कमी समयातच धनवान बनतात. या योगाचे लोक राजसी सुख आणि समाजात मान-सम्मान मिळवतात. या योगाचे लोक सर्वात मोठ्या संकटातून बाहेर पडून यशस्वी होतात.

5 मार्चला तयार होणाऱ्या या राजयोगमुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. करीअरमध्ये प्रगती होऊ शकते.याशिवाय, या राजयोगावर जन्मलेल्या बाळांनाही त्यांच्या जीवनात अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतात. जाणून घेऊ, सध्या या राजयोगामुळे कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळणार आहे...

वृषभ राशि (Taurus Zodiac)
गजकेसरी राजयोग हा वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय फायद्याचे ठरू शकतो. कारण हा राजयोग या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये लग्न स्थानावर आहे. त्यामुळे या वेळी या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. या लोकांची बौद्धिक क्षमता वाढू शकते. तसेच कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य उत्तम राहीन. अविवाहित लोकांना लग्नाचे योग जुळून येईल. व्यवसायात नफा मिळू शकतो. धनलाभाचे योग जुळून येईल.

सिंह राशी (Leo Zodiac)
गजकेसरी राजयोग या सिंह राशीच्या लोकांसाठी मोठ्या फायद्याचा ठरू शकतो. हा राजयोग या राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायात निर्माण होत आहे. त्यामुळे या लोकांची करिअरच्या संबंधित टेन्शन दूर होतील आणि मानसिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो.

कन्या राशी (Kanya Zodiac)
कन्या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग सकारात्मक ठरू शकतो. कारण हा राजयोग या राशीच्या लोकांच्या भाग्य स्थानावर विराजमान राहणार आहे. हा गोचर विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरू शकतो. तसेच जर सरकारी नोकरी संदर्भात हे लोक परीक्षा देत असतील तर त्यांना यश मिळू शकते. त्यामुळे या वेळी या लोकांना नशीबाची साथ मिळेल. अडकलेले कार्य आहे ते मार्गी लागतील. तसेच या दरम्यान हे लोक देश विदेशात प्रवास करू शकतात. या राशीचे लोक धार्मिक आणि मंगल कार्यात सहभागी होऊ शकतात.

हेही वाचा - शनिवारचे उपाय : शनिवारी करा या 5 गोष्टी, शनि महाराज होतील प्रसन्न; इच्छा होतील पूर्ण!

(Disclaimer :  येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री