मुंबई: मेष: योगाभ्यासाची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे शिकण्यास मदत होईल. तसेच, तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. आज तुमच्या आयुष्यातील आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे म्हणता येणार नाही. आज तुम्हाला बचत करण्यात अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये पैशांबाबत वाद होऊ शकतात. पैशांबाबत कुटुंबातील सर्व सदस्यांशी स्पष्ट राहण्याचा सल्ला दिला जातो. तुमचा प्रिय व्यक्ती जरी तुमच्याशी वाईट वागला तरी त्याच्यासोबत प्रेमाने वागा.
वृषभ: हृदयविकाराच्या रुग्णांनी कॉफी प्राशन करणे सोडावे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलणे आवश्यक आहे. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. त्यामुळे, आज पैसे जमा करण्यात तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडचिड कराल. जर तुम्ही तुमच्या मित्रांना मदत कराल तर तुम्हाला बरं वाटेल.
मिथुन: एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. कामाचा डोंगर असला तरी मित्रमंडळींमध्ये मिसळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा.
कर्क: आज तुमचे मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. आजची सायंकाळ रोमँटिक बनवण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा.
सिंह: तुमच्या आकर्षक आणि मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मघू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. तुमची खुबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचे पात्र बनवेल.
कन्या: आज चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका आणि जर उधारी देणे खूप गरजेचे असेल तर उधार देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे.
तूळ: तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय आहे. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागेल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुमची खुबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचे पात्र बनवेल.
वृश्चिक: ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. अनपेक्षित जबाबदाऱ्यांमुळे तुमच्या दैनंदिन योजना विस्कळीत होतील. आज तुम्हाला असं वाटेल की तुम्ही इतरांसाठी खूप काही करत आहात आणि स्वतःसाठी काहीही करत नाही आहात. रिकाम्या वेळेत तुम्ही आज काही खेळ खेळू शकतात परंतु, यावेळेत काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे म्हणून सावधान राहा. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.
धनु: बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. सध्या जरी तुम्ही काही प्रश्नांना सामोरे जात असाल तरी ते क्षणिक असतील, काळाप्रमाणे ते प्रश्न संपून जातील. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील परंतु, रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकतात. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल. इंटरनेट सर्फिंग करणे तुमच्या बोटांचा चांगला व्यायाम करण्यासोबत तुमच्या ज्ञानाला वाढवू शकते.
मकर: तुम्ही तुमचे आवडते छंद जोपासण्यात किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा आनंद घेण्यात वेळ घालवला पाहिजे. दिवसाची सुरुवात चांगली झाली तरी सायंकाळी काही कारणास्तव तुम्ही पैसे खर्च करू शकता, ज्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. तुमच्या जुन्या मित्राचा कॉल आल्याने तुमची सायंकाळ आणखी सुंदर होईल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर आणि अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकतो. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावुक ही होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक जीवनातील शांती भंग करतील.
कुंभ: अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दीष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन चांगले ठेवा. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसासाठी काही उत्तम आठवणी एकत्र करू शकतात, आपल्या कॅमेऱ्याचा सदुपयोग करणे विसरू नका.
मीन: उघडयावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. उगाचच तणाव घेऊ नका, नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. प्रवास केल्याने तुम्ही थकून जाल. प्रवास त्यांना थकवेल आणि ताण वाढवेल, परंतु तरीही तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुम्ही कौटुंबिक मेळाव्यांमध्ये व्यस्त असाल. तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल.
(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)