12 एप्रिल 2025 रोजी, देशभरात हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पवन पुत्र हनुमान यांचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यामुळे दरवर्षी, या तिथीला मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाते. यावर्षी हनुमान जयंतीला काही भाग्यवान राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. त्यासोबतच, या राशींच्या करिअर क्षेत्रातही नवीन संधी उपलब्ध होतील आणि बजरंगबली यांच्याकृपेने त्यांचे सर्व त्रास दूर होतील. चला तर सविस्तर जाणून घेऊया कोण आहेत ते भाग्यवान राशी.
मेष: मेष राशींच्या लोकांसाठी हनुमान जयंतीचा दिवस भाग्यवान असणार आहे. या दिवशी तुम्ही कोणतेही काम हाती घेतले, तर आगामी काळात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या दिवशी, मेष राशींच्या लोकांनी गुंतवणूक केल्यामुळे पैसे मिळण्याची शक्यता असू शकते. या हनुमान जयंतीला, जर तुमचे कोणतेही काम अडकले असतील, तर ते कामे निश्चितच पूर्ण होईल. त्यासोबतच, अंजनी पुत्र हनुमान यांच्या कृपेने तुमचे कष्ट दूर होतील. मेष राशींच्या लोकांनी या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.
सिंह: हनुमान जयंतीच्या निमित्ताने सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना विचार करून घ्या, कारण त्याचा परिणाम थेट तुमच्या प्रगतीवर होऊ शकतो. पवन पुत्र हनुमान यांच्या कृपेने तुमच्या आत्मविश्वासात आणि शक्तीमध्ये वाढ होईल. सोबतच, तुमचे कौटुंबिक जीवनही आनंदी राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात, तुमची तब्येतही उत्तम राहील. लव्ह लाईफच्या हिशोबाने सिंह राशींच्या लोकांसाठी हा दिवस चांगला म्हणता येईल. या दरम्यान, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसीसोबत बराच वेळ घालवाल.
धनु: धनु राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंतीचा दिवस परिपक्व असेल कारण या दिवशी तुम्हाला धनलाभ होईल. इतकंच नाही तर या दिवशी, तुमच्यावर देवी लक्ष्मी यांच्या कृपेची बरसात होईल आणि आर्थिक उन्नतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. यादिवशी, तुमची कामे यशस्वी होतील, त्यासोबत लोकांचे पाठबळदेखील मिळेल. सोबतच, या दिवशी तुमचे सोशल नेटवर्क देखील मजबूत राहील. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला नोकरी मिळू शकते. मात्र, या काळात तुम्ही योग्य आहार ठेवा. यादरम्यान, धनु राशींचे आरोग्य चांगले राहील. या दिवशी, जांभळा रंग घालणे धनु राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली असेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)