प्रत्येक ग्रह ठरलेल्या वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल घडत असतात. अनेक राशींमध्ये विविध बदल आपल्याला पाहायला मिळतो. ज्याप्रकारे ग्रहांच्या राशी बदलत असतात, अगदी त्याचप्रमाणे नक्षत्रदेखील बदलतात. यावर्षी शुक्रवारी 1 एप्रिल 2025 रोजी पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. या नक्षत्राचे स्वामी बृहस्पति आहे. अशातच शुक्र ग्रह गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार असल्यामुळे काही राशींना अत्यंत शुभ फळ मिळतील. 12 एप्रिलमध्ये शुक्र ग्रह भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. या राशींना नशीब आणि आर्थिक यशदेखील मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोण-कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ.
1 - मेष:
मेष राशींच्या लोकांना शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित बदल पाहायला मिळेल. त्यासोबतच तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील. मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. सोबतच मेष राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. रखडलेली कामे लवकरच मार्गी लागेल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल.
हेही वाचा: Chandra Grahan 2025: 'या' दिवशी आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण
2 - कर्क:
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रह हे राहू नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असेल. व्यावसायिक यश मिळण्याचे संकेत दिसत आहेत. अचानक धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नव-नवे स्रोतदेखील निर्माण होतील आणि यासोबत जुन्या स्रोतातून पैसे येतील. कर्क राशीच्या लोकांना घरच्यांची साथ मिळेल. मात्र अशुभ बातमी मिळण्याचे संकेत पाहायला मिळत आहे.
3 - तुळ:
शुक्र ग्रहाचा नक्षत्र तुळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असेल. कामामध्ये तुम्ही महत्वाची कामगिरी सुद्धा मिळवू शकता. यादरम्यान तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. तुळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचे मार्ग निर्माण होतील. त्यासोबतच तुमचा व्यवसाय विस्तार होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)