Wednesday, August 20, 2025 04:35:01 AM

दुसऱ्या कसोटीत भारताचा पराभव

पर्थ कसोटीत पराभवाचा सामना केलेल्या ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे

दुसऱ्या  कसोटीत भारताचा पराभव

ॲडलेड - पर्थ कसोटीत पराभवाचा सामना केलेल्या ऑस्ट्रेलियाने (Australia)  5 सामन्यांच्या मालिकेत 1-1अशी बरोबरी साधली आहे. भारताच्या फलंदाजांची कामगिरी ही  निराशाजनक राहिली असून दोन्ही डावात भारताचे फलंदाज 200 धावांचा आकडा देखील गाठू शकले नाहीत.  
    
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होत असताना भारताचा डाव 5 बाद 128 धावा अशा स्तिथीत होता. भारताकडून यष्टीरक्षक रिषभ पंत 28 धावा आणि नितीश कुमार रेड्डी 15 धावांवर खेळत होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि चौथ्या षटकात भारताने आक्रमक फलंदाज रिषभ पंतला गमावलं. मिचेल स्टार्कने रिषभला 28 धावांवरच रोखले. त्यानंतर मात्र भारताचा डाव जास्त वेळ टिकू शकला नाही. त्यांनतर अश्विन 7, हर्षित राणा 0 तर नितीश कुमार रेड्डी 42 धावांवर बाद झाला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही 7 धावांवर बाद झाल्यावर भारत सर्व बाद 175 अशी धाव संख्या झाली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सचे 5 बळी तर  3 आणि मिचेल स्टार्कने 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिया संघाला जिंकण्यासाठी भारताने फक्त्त 19 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाने 19 धावांचा आकडा 3.2 षटकात घाम न गाळता गाठला. 
 
ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड सामनावीर ठरला. तर हेडने 141 चेंडूत 140  धावा केल्या. हेडची ही खेळी दोन्ही संघातील अंतर ठरले. भारताच्या गोलंदाजांची कामगिरी ही समाधानकारक होती, मात्र भारताच्या फलंदाजांची कामगिरी ही निराशाजनक होती. वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या कामगिरीने काहीच प्रभाव टाकू शकले नाहीत. रोहित शर्माची कसोटीमधील कामगिरी ही निराशाजनक राहिली आहे. त्याचं शेवटचं कसोटी शतक मार्च 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध आलं होतं. त्यांनतर मात्र तो एकदाच 50 चा आकडा पूर्ण करू शकला.

पुढचा सामना ह्या दोन्ही संघातील 14 डिसेंबरला सुरु होईल. भारत जर हा सामना हरला तर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडणार आहे. भारताच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्वाचा आहे.


सम्बन्धित सामग्री