Wednesday, August 20, 2025 04:33:30 AM

Arjun Tendulkar and Saaniya Chandok Engagement : सचिन तेंडुलकरच्या घरी सनई-चौघडे वाजणार ? अर्जुन तेंडुलकरचा होणारी बायको आहे मोठ्या उद्योगपतीची नात, जाणून घ्या

अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा रवी घई यांची नात सानिया चांडोकशी झाला आहे. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात झाला

arjun tendulkarsaaniya chandok engagement  सचिन तेंडुलकरच्या घरी सनई-चौघडे वाजणार   अर्जुन तेंडुलकरचा होणारी बायको आहे मोठ्या उद्योगपतीची नात जाणून घ्या
arjun tendulkar and sania chandok

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप धावा काढणारा सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा पार पडला असल्याची माहिती समोर आली आहे. अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा रवी घई यांची नात सानिया चांडोकशी झाला आहे. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात झाला. दोन्ही कुटुंबांचे जवळचे सदस्य आणि मित्र या साखरपुड्यासाठी उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. 

कोण आहे सानिया चंडोक ? 

सानिया चंडोक ही मोठ्या प्रसिद्ध उद्योजक कुटुंबातील आहे. घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरी असलेला आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत. सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया चंडोक हिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. याशिवाय ती मिस्टर पॉजची संस्थापकदेखील आहे. सानिया ही मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये भागीदार आणि संचालक आहे.

अर्जुन तेंडुलकरची क्रिकेटमधील कामगिरी : 

अर्जुन तेंडुलकरने 2020-21 मध्ये मुंबईकडून त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीची सुरुवात केली. पदार्पणात तो हरियाणाविरुद्ध टी-20 सामना खेळला. यापूर्वी, त्याने ज्युनियर स्तरावर मुंबईचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळवले. 2022-23 च्या हंगामात तो गोव्यात गेला, जिथे त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. अर्जुन तेंडुलकरने 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेतल्या आहेत आणि 532 धावा केल्या आहेत.

अर्जुन तेंडुलकरला 2025 च्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुन नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो आणि खालच्या फळीत फलंदाजीदेखील करू शकतो. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत 17 प्रथम श्रेणी सामने, 18 लिस्ट ए सामने आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत.


 


सम्बन्धित सामग्री