IPL 2025: केकेआरचा नवा कर्णधार जाहीर, अजिंक्य रहाणेवर विश्वास
कोलकाता नाइट राइडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या हंगामासाठी आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याच्याकडे संघाची कमान सोपण्यात आली आहे. तर व्यंकटेश अय्यर याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. KKR ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
KKR ने अजिंक्य रहाणे याला 1.5 कोटी रुपयांच्या बेस प्राईजवर बोली लावत आपल्या संघात सामिल करून घेतले होते. रहाणे याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. यामुळे KKR व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास टाकला आहे. विशेष म्हणजे, रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती. रहाणे IPL मध्ये अनेक संघांचा भाग राहिला आहे. त्याचा अनुभव KKR साठी फायदेशीर ठरणार आहे.
व्यंकटेश अय्यर याला KKR ने 23.75 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेवर संघात ठेवले आहे. आता त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
KKR ने श्रेयश अय्यरच्या नेतृत्वात खेळताना IPL 2024 चे विजेतेपद पटवकावले होते. पण मेगा ऑक्शनपूर्वी संघाने श्रेयस अय्यर याला संघातून रिलीज केले होते. आता अय्यर पंजाब किंग्जचा भाग आहे. तो पंजाबला पहिले वाहिले विजेतेपद जिंकून देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
हेही वाचा - IND vs NZ: 4852 वनडे सामन्यांमध्ये प्रथमच घडला असा विक्रम, तुम्हाला विश्वास बसणार नाही!
KKR चे सीईओ वेंकी मैसूर यांनी रहाणे आणि अय्यर यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, 'आम्ही अजिंक्य रहाणे सारख्या व्यक्तीला मिळवून आनंदित आहोत. तो एक लीडर म्हणून आपला अनुभव पणाला लावतो. तसेच व्यंकटेश अय्यर KKR साठी एक फ्रँचायझी खेळाडू राहिला आहे आणि त्याच्यात नेतृत्वाचे गुण आहेत. आम्हाला विश्वास आहे की दोघेही संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी झोकून देतील.'
कर्णधारपदाची धुरा हाती आल्यानंतर रहाणे म्हणाला की, "KKR ही IPL मधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. मला KKR चे नेतृत्व करण्यासाठी संधी मिळाली, ही सन्मानाची गोष्ट आहे. आमच्याकडे एक चांगला आणि संतुलीत संघ आहे. आम्ही विजेतेपदासाठी मैदानात उतरू."
हेही वाचा - IND vs AUS: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियात बदल?, 'या' खेळाडूची जागा धोक्यात!
IPL 2025 साठी असा आहे KKR चा संघ -
अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर (उपकर्णधार), रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमनदीप सिंह, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मारकंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेंसर जॉनसन, लवनिथ सिसोदिया, अनुकूल रॉय, मोईन अली, उमरान मलिक