Wednesday, August 20, 2025 10:15:42 AM

IPL 2025 Points Table : RCB ची MI वर मात, सूर्या-पांड्याचं थोडक्यानं हुकलं मुकुट

IPL 2025 Points Table : आरसीबीने मुंबईचा पराभव केला. या सामन्यानंतर गुणतालिकेत काय बदल झाले. तसंच ऑरेंज कॅप, पर्पल कॅपवर कोणत्या खेळाडूने पकड निर्माण केली आहे. हे पाहुयात..

ipl 2025 points table  rcb ची mi वर मात सूर्या-पांड्याचं थोडक्यानं हुकलं मुकुट
IPL 2025 Points Table : RCB ची MI वर मात, सूर्या-पांड्याचं थोडक्यानं हुकलं मुकुट

IPL 2025 Points Table : मुंबई: IPL 2025 मध्ये सोमवारी झालेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने मुंबई इंडियन्स (MI) संघावर 12 धावांनी रोमांचक विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात RCB ने विराट कोहली (67) आणि रजत पाटीदार (64) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळींच्या जोरावर प्रथम फलंदाजी करत 222 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी आक्रमक फलंदाजी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला.

 

अशी आहे गुणतालिका स्थिती

RCB चा हा 4 सामन्यांतील तिसरा विजय ठरला. यासह RCB संघ सध्या 6 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रन रेट +1.015 इतका आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा हा 5 सामन्यांतील चौथा पराभव आहे. मुंबईचा संघ फक्त एक सामना जिंकू शकला आहे. ते 2 गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत.   

 

ऑरेंज कॅप पूरनकडे, सूर्या पिछाडीवर

सूर्यकुमार यादवने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात 26 चेंडूंमध्ये 28 धावांची खेळी केली. यासह त्याने या हंगामात खेळताना 5 सामन्यांत 199 धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. सद्या ऑरेंज कप ही लखनऊ सुपर जायंट्सचा धाकड खेळाडू निकोलस पूरन कडे आहे. पण सुर्या केवळ 3 धावांनी मागे आहे.

 

टॉप 5 फलंदाज – IPL 2025 (सर्वाधिक धावा MI VS RCB सामन्यापर्यंत):

 

  1. निकोलस पूरन (LSG) – 201 धावा
  2. सूर्यकुमार यादव (MI) – 199 धावा
  3. साईं सुदर्शन (GT) – 191 धावा
  4. मिशेल मार्श (LSG) – 184 धावा
  5. जोस बटलर (GT) – 166 धावा

 

 

पर्पल कॅप शर्यतीत पांड्या संयुक्त 

हार्दिक पांड्याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात 4 षटकांत 45 धावा देत 2 विकेट घेतल्या. त्याने या हंगामात 10 गडी बाद केले आहेत. समान विकेट्स असूनही तो नूर अहमदच्या मागे राहिला आणि पर्पल कॅप मिळवण्यास अपयशी ठरला.

 

टॉप 5 गोलंदाज – IPL 2025 (सर्वाधिक विकेट्स MI VS RCB सामन्यापर्यंत):

 

  1. नूर अहमद (CSK) – 10 विकेट्स
  2. हार्दिक पांड्या (MI) – 10 विकेट्स
  3. मिचेल स्टार्क (DC) – 9 विकेट्स
  4. मोहम्मद सिराज (GT) – 9 विकेट्स
  5. खलील अहमद (CSK) – 8 विकेट्स 

 

 


सम्बन्धित सामग्री