Viral Video: बाप आणि लेकीचं नातं मायेचं, विश्वासाचं आणि सुरक्षिततेचं असतं. मात्र, एका विकृत कृत्याने या नात्याला कलंक लावला आहे. सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जिथे एका व्यक्तीने स्वतःच्या मुलीशीच लग्न केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, समाजातल्या नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमका काय आहे व्हिडीओ?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की, 'माझ्या मुलीचं लग्न दुसऱ्या कुणाशी होईल, ती आनंदी राहील की नाही, हे माहीत नव्हतं. म्हणून मीच तिच्याशी लग्न केलं.' इतकंच नाही, तर तो तिच्या दोन महिन्यांच्या गरोदर असल्याचंही सांगतो. मात्र, कुटुंबातील आणि बाहेरच्या लोकांनी या विकृत नात्याला मान्यता नाकारली आहे.
हेही वाचा: शिक्षकाचं रूप की विकृती? भरवर्गात विद्यार्थिनींशी गैरवर्तन, पालक संतप्त!
संतप्त नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @niku.sad_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होताच या व्हिडीओला 25 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, नेटकऱ्यांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे.
• 'हे तर कलियुग आहे!'
• 'तुम्हाला लाज वाटत नाही का? निदान बाप-मुलीच्या नात्याचा तरी सन्मान ठेवा!'
• 'दुनिया कधी सुधारणार?'
अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. लोक या घटनेबाबत आश्चर्य आणि धक्का व्यक्त करत आहेत. हा प्रकार ऐकून लोक प्रचंड अस्वस्थ झाले असून, कायदेशीर कारवाईची मागणी केली जात आहे.नात्यांच्या रक्षणासाठी कायदे आहेत, पण जर समाजातच नैतिकतेचा अभाव राहिला तर कायद्यांचा उपयोग काय? असं बोललं जातंय तर इंटरनेटवर या घटनेबाबत तीव्र नाराजी आणि आक्रोश व्यक्त केला जात आहे.