Stag Beetle : स्टॅग बीटल हा एक कीडा असून तो दुर्मीळ कीटकांच्या श्रेणीत येतो. हा जगातील सर्वात महागडा कीटक मानला जातो. उष्ण आणि उष्णकटिबंधीय हवामानात वाढणारे हे कीटक केवळ त्यांच्या दुर्मिळतेसाठीच मौल्यवान नाहीत; तर, त्यांना शुभेच्छांचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात संपत्ती येते, अशी अनेकांची श्रद्धा आहे.
जगभरातील लोक घरातील कीटकांना मारण्यासाठी अनेक पद्धती अवलंबतात, परंतु एक कीटक असा आहे, ज्याला लोक चक्क आपल्या घरातच ठेवू इच्छितात. इतकेच नाही, तर तो महागड्या किमतीत खरेदी देखील करतात. या कीटकाचे नाव स्टॅग बीटल आहे आणि तो जगातील सर्वात महागड्या कीटकांपैकी एक आहे. स्टॅग बीटलची किंमत तब्बल 75 लाख रुपयांपर्यंत असते.
हेही वाचा - VIDEO : वनअधिकाऱ्याने X वर शेअर केला हत्तींच्या पिल्लांचा सुंदर व्हिडिओ; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव
काय आहे स्टॅग बीटलची खासियत?
स्टॅग बीटलची अशी कोणती खासियत आहे, जी त्यांना खूप महाग बनवते, चला जाणून घेऊ. हे कीटक खूपच दुर्मिळ तर आहेतच आणि ते औषधांमध्येही देखील वापरले जातात. काही लोक त्यांना भाग्यवान मानत असल्याने तेही या कीटकींविषयीचे एक आकर्षण आहे. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, स्टॅग बीटल घरात ठेवून तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता. अशा परिस्थितीत, लोक या कीटकाला कोणत्याही किंमतीला खरेदी करण्यास तयार असतात.
सायंटिफिक डेटा जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, हे कीटक वन परिसंस्थेतील महत्त्वाच्या सॅप्रोक्सिलिक गटाचे प्रतिनिधी आहेत. लंडनस्थित नॅचरल हिस्ट्री म्युझियमनुसार, स्टॅग बीटलचे वजन 2 ते 6 ग्रॅम असते आणि त्यांचे सरासरी आयुष्य 3 ते 7 वर्षे असते. नर स्टॅग बीटल 35-75 मिमी लांब आणि मादी 30-50 मिमी लांब असतात. त्यांना त्यांच्या लांब जबड्यांसाठी आणि नरांना बहुरूपतेसाठी ओळखले जाते.
स्टॅग बीटल कुठे आढळतात?
स्टॅग बीटल उबदार, उष्णकटिबंधीय वातावरणात वाढतात आणि थंड तापमानाला संवेदनशील असतात. ते नैसर्गिकरित्या जंगलात राहतात. परंतु, हेजरो, पारंपारिक बागा आणि उद्याने आणि बागांसारख्या शहरी भागात देखील आढळू शकतात. जिथे कोरडे लाकूड मोठ्या प्रमाणात असते, तेथेही हे आढळतात. स्टॅग बीटलच्या अळ्या मृत लाकडावर जगतात. त्यांच्या तीक्ष्ण जबड्यांचा वापर करून तंतुमय पृष्ठभागावरील बारीक तुकडे काढतात आणि खातात. हे कीटक केवळ मृत म्हणजेच, सुकलेले लाकूड खातात. स्टॅग बीटल जिवंत झाडांना किंवा झुडुपांना कोणताही धोका पोहोचवत नाहीत. यामुळे ते निरोगी वनस्पतींसाठी चांगले ठरतात.
या कीटकाचे स्टॅग बीटल हे नाव नर बीटलच्या खास प्रकारच्या डोक्यामुळे पडले आहे. याचे डोके हरणाच्या शिंगांसारखे दिसते. हा त्याचा वैशिष्ट्यपूर्ण जबढा असतो. प्रजनन काळात मादींसोबत संभोग करण्याची संधी मिळवण्यासाठी नर बीटल त्यांच्या विशिष्ट, शिंगासारख्या जबड्यांचा वापर एकमेकांशी लढण्यासाठी करतात. बीटलची दुर्मीळता, पर्यावरणीय महत्त्व आणि सांस्कृतिक श्रद्धा यांचे संयोजन यामुळे हे कीटक अत्यंत मौल्यवान ठरले आहेत. यामुळेच त्यांची बाजारात लाखोंना विक्री होते.
हेही वाचा - आंघोळ करताना बाथरूममध्ये बेशुद्ध पडली 18 वर्षीय तरुणी; कशीबशी वाचली, तुम्हीही ही चूक करत नाही ना?