Saturday, September 06, 2025 06:36:01 AM

Austrian Economist's Break India Post : कोण हा भारताविरुद्ध विष ओकणारा उपटसुंभ? म्हणे, भारताचे तुकडे..

ऑस्ट्रियाचा कथित अर्थशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित नाटो 'विस्तार समिती'चे अध्यक्ष गुंथर फेलिंगर-जान यांनी भारताविरुद्ध विषारी विधाने करून नवा वाद निर्माण केला आहे.

austrian economists break india post  कोण हा भारताविरुद्ध विष ओकणारा उपटसुंभ म्हणे भारताचे तुकडे

Austrian Economist's Break India Post :  सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफचा मुद्दा गाजतोय. तसेच, भारत सर्वच क्षेत्रांमध्ये करत असलेली प्रगती अनेकांच्या डोळ्यांत खुपतेय. याशिवाय, अमेरिका युरोपसह अनेक देश रशियाचे कडवे विरोधक आहेत. पण भारताची रशियासोबत घट्ट मैत्री आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी अशी अमेरिकेसह युरोपची इच्छा आहे. पण भारताने आपल्या तटस्थेच्या धोरणानुसार रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवलीय. अशामध्ये अनेकांना भारताने अनेक वर्षांच्या मेहनतीने मिळवलेली जगामध्ये टिकणारी आणि स्वतःला बलाढ्य समजणाऱ्या अमेरिकेलाही प्रत्युत्तर देणारी स्पर्धात्मकता पाश्चिमात्य आणि युरोपीय देशांना सहन होत नाहीये. त्यामुळे काहीजणांना भारताच्या एकंदरित भूमिकेवर आणि धोरणावर प्रचंड आक्षेप आहे. त्यातूनच भारत तोडण्याची भाषा होत आहे.

भारताचे तुकडे पाडलेला नकाशा

आता ऑस्ट्रियाचा कथित अर्थशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित नाटो 'विस्तार समिती'चे अध्यक्ष गुंथर फेलिंगर-जान यांनी भारताविरुद्ध विषारी विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. गुंथर याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक पोस्ट करत यामध्ये भारताचे तुकडे करण्याबद्दल बोलले आहे आणि 'एक्स-इंडिया' नावाचा नकाशा शेअर केला आहे. यामध्ये भारताचे अनेक भाग पाकिस्तान, बांगलादेश आणि कथित खलिस्तानचा भाग असल्याचे दाखवले आहे.

गुंथर याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी भारताचे तुकडे करण्याचं आवाहन करतो. नरेंद्र मोदी रशियाचा माणूस आहे. मोदी हे रशियाचे समर्थक आहेत. आम्हाला खलिस्तानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करण्याची / करणाऱ्यांची गरज आहे. या विधानामुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे. सामान्य लोकांपासून ते जाणकारांपर्यंत सर्वजण अशा प्रकारची पोस्ट आणि विचारांना भारताच्या सार्वभौमत्वासाठी धोका मानत आहेत.

हेही वाचा - Kim Jong Un - Putin Meet : पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंग उन यांच्या अंगरक्षकांनी सर्व पुरावे मिटवले; Video आला समोर

हा काय वेडेपणा आहे? - प्रियंका चतुर्वेदी

लोकांनी म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा ताबडतोब ऑस्ट्रियन दूतावासासमोर उपस्थित करावा. राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हा काय वेडेपणा आहे? भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEAIndia) ऑस्ट्रियन दूतावासाकडे हा मुद्दा उपस्थित करावा.

राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यास पाठिंबा दिला आहे. दरम्यान, 2023 पासून गुंथर यांची एक 'X' पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधींना भारताचे पुढचे पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिला आहे. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि चीनचे समर्थक असल्याचे म्हटले आहे.

भारताने सावध राहण्याची गरज

दरम्यान, सध्या भारताला टॅरिफ आणि व्यापाराच्या आडून धमक्या देणाऱ्या अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात रशियाचे खच्चीकरण करण्यासाठी खंडप्राय असलेल्या रशियाचे तुकडे पाडले होते, हे विसरून चालणार नाही. आता काही पाश्चिमात्य भारताबाबत उघड उघड अशी भाषा वापरत आहेत. तेव्हा, आताच्या स्थितीत भारताने सावध राहण्याची गरज आहे.

हेही वाचा - Vladimir Putin : भारत, चीनवरील निर्बंधांच्या अमेरिकेच्या धोरणावर पुतिन यांची सडकून टीका; म्हणाले 'वसाहतवादी युग आता संपलंय...'


सम्बन्धित सामग्री