Sunday, August 31, 2025 04:06:56 PM

Pakistan Train Hijack: पाकिस्तानी सैन्याला मोठे यश, 104 ओलिसांची सुटका, 16 दहशतवादी ठार

पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी अशांत बलुचिस्तान प्रांतात संशयित बलुच दहशतवाद्यांनी एका ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या 104 प्रवाशांची सुटका केली असून 16 दहशतवाद्यांना ठार केले.

pakistan train hijack पाकिस्तानी सैन्याला मोठे यश 104 ओलिसांची सुटका 16 दहशतवादी ठार
Pakistan Train
Edited Image, प्रतिकात्मक प्रतिमा

Pakistan Train Hijack Update: पाकिस्तानी रेल्वे अपहरण प्रकरणात पाकिस्तानी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी अशांत बलुचिस्तान प्रांतात संशयित बलुच दहशतवाद्यांनी एका ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या 104 प्रवाशांची सुटका केली असून 16 दहशतवाद्यांना ठार मारले. इतर प्रवाशांनाही बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. बलुच आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

हेही वाचा - Pakistan Train Hijack: 'लष्करी कारवाई केली तर 182 ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना मारण्यात येईल'; ट्रेन हायजॅक केल्यानंतर BLA चा शाहबाज सरकारला इशारा

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ डब्यांमध्ये सुमारे 500 प्रवाशांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेस मंगळवारी सकाळी गुडलार आणि पिरू कोनेरी भागात क्वेट्टाहून पेशावरला जात असताना गोळीबार झाला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुरक्षा दलांनी 13 दहशतवाद्यांना ठार मारले असून 104 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू आहे. तत्पूर्वी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि म्हटले की, त्यांनी ट्रेनचा ताबा घेतला असून 100 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवले आहे.

हेही वाचा - पाकिस्तानात अख्खी ट्रेनच झाली हायजॅक..! बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या प्रमुख गटाने स्वीकारली जबाबदारी

दरम्यान, बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी एका कोचमधून 43 पुरुष, 26 महिला आणि 11 मुले अशा 80 प्रवाशांना वाचवण्यात यश मिळवले. नंतर, आणखी 24 प्रवाशांनाही वाचवण्यात आले. त्यांनी सांगितले की, बोगद्याच्या आत असलेल्या ट्रेनमध्ये अजूनही सुमारे 400 प्रवासी आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. पेशावरला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनवर गोळीबार झाल्याच्या वृत्तानंतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाल्याचे रिंद यांनी सांगितले. 

पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर - 

या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे अधिकृत वृत्त नाही. परंतु एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पुष्टी केली की, पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. 

गेल्या वर्षी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू - 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, पाकिस्तान रेल्वेने दीड महिन्यांहून अधिक काळ थांबल्यानंतर क्वेट्टा आणि पेशावर दरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षभरात बलुचिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. तथापी, नोव्हेंबर 2024 मध्ये क्वेटा रेल्वे स्टेशनवर झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान 26 जणांचा मृत्यू झाला होता. 


सम्बन्धित सामग्री