Saturday, September 06, 2025 06:18:27 AM

Department of War: अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून होणार ‘युद्ध विभाग’; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

‘टॅरिफ वॉर’, शासकीय विभागांमध्ये टाळेबंदी, शिक्षण विभाग बंद करणे यांसारख्या निर्णयांनंतर आता ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्रालयाशी संबंधित ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

department of war अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून होणार ‘युद्ध विभाग’ डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Department of War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दुसऱ्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सलग काही महत्त्वाचे आणि वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. ‘टॅरिफ वॉर’, शासकीय विभागांमध्ये टाळेबंदी, शिक्षण विभाग बंद करणे यांसारख्या निर्णयांनंतर आता ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्रालयाशी संबंधित ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

ट्रम्प यांनी जाहीर केले की अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे (Department of Defense) नाव बदलून आता ‘युद्ध विभाग’ (Department of War) केले जाईल. पेंटागॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंत्रालयाचे नवे नाव आज, शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून अधिकृतपणे लागू होणार आहे.

हेही वाचा - Austrian Economist's Break India Post : कोण हा भारताविरुद्ध विष ओकणारा उपटसुंभ? म्हणे, भारताचे तुकडे..

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की या बदलामागे त्यांचा उद्देश अमेरिकन सैन्याची अधिक आक्रमक आणि प्रभावी प्रतिमा जगासमोर आणणे आहे. 'डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स' हे नाव खूपच बचावात्मक वाटते. मात्र, अमेरिकेने केवळ संरक्षणच नव्हे तर आक्रमक क्षमतांवर देखील भर दिला पाहिजे. ‘युद्ध विभाग’ हे नाव आपल्या सैन्याच्या शक्तीचे आणि योद्धा संस्कृतीचे उत्तम प्रतिबिंब आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

हेही वाचा - Cyber Attack On USA: अमेरिका सायबर हल्ल्याच्या चक्रात, ट्रम्प आणि JD वेंससह लाखो कॉल्स आणि फाईल्स गेल्या चोरीला; थेट चीनवर आरोप

या निर्णयाला अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सैन्याचा मुख्य हेतू देशाचे रक्षण करणे असला तरी, आजच्या जागतिक परिस्थितीत अमेरिकेने स्वतःला एक शक्तिशाली आणि आक्रमक राष्ट्र म्हणून सादर करणे आवश्यक आहे. तथापि, या निर्णयावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांचे म्हणणे आहे की, अशा पावलामुळे अमेरिका अधिक आक्रमक राष्ट्र म्हणून ओळखली जाईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढू शकतो. तरीदेखील, ट्रम्प आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसते.
 


सम्बन्धित सामग्री