देवनार पोलिसांनी सोमवारी एका क्रिकेट प्रशिक्षकाला

Mumbai Crime : भयंकर! क्रीडा मैदानातील प्रसाधनगृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

देवनार पोलिसांनी सोमवारी एका क्रिकेट प्रशिक्षकाला त्याच्या 13 वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल अटक केली. गोवंडी येथील क्रीडा मैदानातील 'प्रसाधनगृहात' प्रशिक्षण सत्रानंतर गेल्या आठवड्यात ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. हे मैदान मुंबई महापालिकेद्वारे व्यवस्थापित केले जाते. पीडिता तिच्या प्रशिक्षण सत्रानंतर विश्रांती घेत असताना आरोपी आत आला आणि तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

घाटकोपर येथील रहिवासी असलेली पीडित महिला गेल्या अनेक महिन्यांपासून गोवंडी येथे प्रशिक्षणासाठी जात होती. सोमवारी पीडितेच्या कुटुंबाने घाटकोपरमधील पंत नगर पोलिसांकडे संपर्क साधला, तेव्हा हे प्रकरण समोर आले, "हा गुन्हा देवनारमध्ये घडला असल्याने, आम्ही शून्य एफआयआर नोंदवला आहे. तसेच हे प्रकरण तात्काळ देवनार पोलिसांकडे सोपवले आहे," असे पंत नगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: भारतात आतापर्यंत कितीवेळा ढगफुटी झाली? विनाशकारी ढगफुटीच्या घटनांमध्ये गेला 'इतक्या' लोकांचा जीव

याबाबत समजताच देवनार पोलिसांनी आरोपीला अटक केली. गोवंडी येथील रहिवासी राजेंद्र नानासाहेब पवार (वय 41) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडितेने म्हटले आहे की, आरोपीने तिला काहीही न सांगण्याची धमकी दिली होती, म्हणूनच ती गप्प राहिली आणि तिच्या पालकांना कळवल नाही.

दरम्यान, तिच्या असामान्य वागण्यामुळे संशय निर्माण झाला आणि वारंवार चौकशी केल्यानंतर, तिने चिंताग्रस्त अवस्थेत तिच्या पालकांना ही भयानक माहिती दिली. अटकेनंतर पोलिसांना आढळून आले की, आरोपीवर अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.