Aaishvary Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची बॉलीवूडमध्ये एंट्री; Nishaanchi चित्रपटातून करणार पदार्पण, Teaser रिलीज
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य ठाकरे लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे याचा आगामी चित्रपट निशांची येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हटके आणि कल्ट चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अनुराग्य कश्यप यांच्या निशांची चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आज या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये भावना, अॅक्शन, ड्रामा आणि विनोदाचे मिश्रण असल्याचे पाहायला मिळते. हा टीझर बघून नेटकऱ्यांना गँग्ज ऑफ वासेपूर चित्रपटाची आठवण होत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
शुक्रवारी कश्यपने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचा अधिकृत टीझर शेअर केला. क्लिप शेअर करताना दिग्दर्शकाने लिहिले, “तायरी कर दी है! इमोसन का तडका, अभिनय का धमाका, और गुलेल, कट्टा, गाडी, घोडा तो है ही भैया…#निशांची टीझर आऊट… 19 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होत आहे.”
निशांची हा चित्रपट दोन भावांमधील गुंतागुंतीच्या बंधनाभोवती फिरतो. एक मिनिट 30 सेकंदांच्या या टीझरची सुरुवात "बिना बॉलीवूड, कौनो जिंदगी कैसे जिये?" (बॉलीवूडशिवाय कसे जगता येईल) या ओळीने होते. नंतर दमदार संगीत, नृत्य दृश्ये, तीव्र अॅक्शन आणि नाट्यमय क्षणांमध्ये चित्रपटातील पात्रांची ओळख करून देते. त्यामुळे आता टिपिकल बॉलीवूड मसाला चित्रपट पाहायला मिळणार, अशी आशा प्रेक्षक व्यक्त आहेत. शिवाय ऐश्वर्य ठाकरेकडूनही नेटकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.