मराठीसह हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साक

Actor Achyut Potdar : ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन; आज ठाण्यात होणार अंत्यसंस्कार

मुंबई : मराठीसह हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या 91 व्या वर्षी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सैन्यात कॅप्टन पदावरून निवृत्ती घेतलेल्या अच्युत पोतदार यांनी शिक्षण, भारतीय सैन्य दलात सेवा, इंडियन ऑइल कंपनीतील करिअर आणि नंतर अभिनय या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलं.

अच्युत पोतदार यांची '3 इडियट्स' चित्रपटातील प्राध्यापकाची भूमिका आणि डायलॉग प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सोमवारी रात्री उशीर निधन झाल्यानंतर मंगळवारी, 19 ऑगस्ट रोजी ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. सुरुवातीला भारतीय सैन्यात आणि नंतर इंडियन ऑइल कंपनीत काम करणाऱ्या अच्युत पोतदार यांनी 1980 च्या दशकात आपली अभिनय क्षेत्रातील आवड जोपासण्यासाठी चित्रपट आणि छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम केले.

हेही वाचा : Gautami Patil New Song : गौतमी पाटीलचं 'राणी एक नंबर' गाणं प्रदर्शित, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत 125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्ध सत्य', 'तेजाब', 'परिंदा', 'राजू बन गया जेंटलमन', 'दिलवाले', 'रंगीला', 'वास्तव', 'हम साथ रहना', 'हम साथ रहना', 'भाई', 'दबंग 2' आणि 'व्हेंटिलेटर' अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. तसेच 'वागले की दुनिया', 'माझा होशील ना', 'मिसेस तेंडुलकर' आणि 'भारत की खोज' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं.