Shilpa Shetty's Bastian Restaurant : 'बास्टियन' नऊ वर्षांनी होणार बंद; शिल्पा शेट्टीनं स्वतः दिली माहिती
मुंबई : मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट्सपैकी एक आणि सेलिब्रिटींचे आकर्षण असलेले बास्टियन वांद्रे, गुरुवार, 3 सप्टेंबर रोजी आपले दरवाजे बंद करत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बास्टियन हॉस्पिटॅलिटीचे रेस्टॉरंटचालक रणजित बिंद्रा यांच्या सह-मालकीचे असलेले, वांद्रे आऊटलेट हे गेल्या नऊ वर्षांपासून सुरू होते. 2016 मध्ये पहिल्यांदा लाँच झालेले, बास्टियन मुंबईतील उत्तम जेवणाच्यासाठीचे रेस्टॉरंट म्हणून ओळखले जाऊ लागले. 2023 मध्ये, रेस्टॉरंट वांद्रे पश्चिमेकडील लिंकिंग रोडवरील एका मोठ्या जागेत स्थलांतरित झाले. जवळपास एक दशक, ते केवळ एक रेस्टॉरंट म्हणूनच नव्हे तर एक सांस्कृतिक स्थळ म्हणूनही उभे राहिले.
शिल्पा शेट्टीनं इंस्टाग्रामवर बास्टियन बंद होण्याबाबतची घोषणा केली. त्यांनी याला "एका युगाचा अंत" असे म्हटले आहे. मुंबईच्या जेवणाच्या आणि नाईटलाइफच्या कथेत त्याचं नाव कोरलं गेलं आहे, अशी प्रतिक्रिया नेटीजन्सनं व्यक्त केली आहे. मात्र वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील रेस्टॉरंट जरी बंद होत असले तरी दादर पश्चिमेतील त्याचे आउटपोस्ट सुरूच राहणार आहेत. बास्टियन अॅट द टॉप, कोहिनूर स्क्वेअरच्या 48 व्या मजल्यावर असून मुंबईकरांना येथील जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.