पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झाल
Bus Accident : पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमानमध्ये बस अपघात; 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघातात दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या अपघातात 25 जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बर्धमान मेडिकल कॉलेजचे अधीक्षक तपोश घोष यांनी एएनआयला सांगितले की, जखमींपैकी पाच जण गंभीर जखमी आहेत. "दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून 25 जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 25 जखमींपैकी पाच जणांना गंभीर दुखापत झाली आहे. गंगा सागर येथून येत असताना त्यांच्या बसला अपघात झाल्याचे घोष यांनी सांगितले.