गेल्या 48 तासांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघ

Mumbai Rain Update : मुंबई उपनगरातील वाहतूक मंदावली, जागोजागी पाणी साचल्यानं प्रवासात अडथळा

मुंबई : गेल्या 48 तासांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर कोसळत अलसेल्या पावसामुळे या शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसानंतर आज, मंगळवारीदेखील पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी रात्रभर पाऊस पडत असल्यामुळे आज पहाटेपासूनच शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर, सब-वेमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. काल पडलेल्या पावसामुळे मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आज शाळा-कॉलेज बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले. 

हेही वाचा : Today's Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार बँकिंग क्षेत्रात सुवर्ण संधी! यशाचे नवे दरवाजे खुलणार; जाणून घ्या

दरम्यान, इंडिगो एअरलाइन्सने प्रवास सल्लागार पत्रक जारी केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर पाणी साचले आहे. विमान वाहतूक सेवा मंदावली आहे. यामुळे ऑपरेशनल अडचणी निर्माण झाल्या आहेत, प्रस्थान आणि आगमन दोन्हीमध्ये विलंब होत आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत."

पावसाचे अपडेट्स -

ट्रकच्या बिघाडामुळे वडाळा टी. जंक्शन (एव्हराड नगर) चुनाभट्टी येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

दीड ते दोन फुटापर्यंत दादर टी .टी. येथे पाणी साठले असल्याने वाहतूक संथ गतीने चालू आहे

दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सबवे ,अँटॉप हील या ठिकाणी एमजीआर चौक, कानेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षानगर, त्याचप्रमाणे दादर टीटी, या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साठले असल्याने वाहतूक संत गतीने चालू आहे .

गोल देऊळ, गुलालवाडी, वडाळा, शिवडी, नबाब टॅन्क , नागपाडा ,मराठा मंदिर, भायखळा,बावला कंपाऊंड, भोईवाडा,वडाळा स्टेशन चार रस्ता, हिंदमाता जंक्शन, माटुंगा ,गांधी मार्केट या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साठले असल्याने वाहतूक संत गतीने चालू आहे.

मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या, राज्यातील पावसामुळे विद्यापीठाचा निर्णय

पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे.

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबू लागले.

मुंबई पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.

पावसामुळे रेल्वे वाहतूक सेवा धिम्या गतीने सुरू 

मुंबईत आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशार हवामान खात्याकडून देण्यात आला असून बुधवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.