अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रो
Viral Video In Akola : दुचाकीवरील दोघांकडून अकोल्यातील सरपंचाला मारहाण; पेट्रोलपंपावरील घटना सीसीटीव्हीत कैद
अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रोलपंप येथे एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या पेट्रोलपंप येथे दुचाकीवर आलेल्या दोन जणांकडून ही मारहाण झाल्याचे दिसून येत आहे. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालू असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मारहाणीचं मूळ कारण अद्याप समोर आलं नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामं आटपून गावी जात होते. वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले. याचवेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून हा वाद झाला, अन या वादादरम्यान सरपंच फुके यांना दोन व्यक्तींनी मारहाण केली. या प्रकरणात मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.