मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यांमधील विवि

Heavy Rain Alert : मुंबईसह उपनगराला पावसानं झोडपलं; राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

मुंबई : मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यांमधील विविध भागात गेल्या 24 तासांत पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रभर पडत असलेल्या पावसानं सोमवारी पहाटेपासूनच जोर धरला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह रायगड जिल्ह्यामध्येही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आजही अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून आठवड्याच्या पहिल्या दिवशी शाळा-कॉलेज, नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची चांगलीच ताराबंळ उडाली. मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील रेल्वे आणि बससेवेवर दिसून आला. रस्त्यांवरील वाहतुककोंडी आणि खड्ड्यांमुळे वाहतूकसेवा कोलमडल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबईकर जेरीस आले. 

हेही वाचा : CP Radhakrishnan: महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रमोशन; भूषवणार महत्वाचं 'हे' देशाचं पद

भारतीय हवामान खात्याकडून 17 ते 21 दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे. यादरम्यान समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी 50-60 किमी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले आहे.