Maratha Aarakshan : तरुण आंदोलकावर ओढवलं संकट; दैव बलवत्तर म्हणून बचावला, झालं असं की...
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, मराठा आंदोलक मुंबईत दाखल होण्यापूर्वी जुन्नरमध्ये एका आंदोलकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. सतीश देशमुख असं या आंदोलकाचं नाव होतं. पुन्हा एकदा दुर्दैवी घटना होताहोता वाचली. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत आलेल्या मराठा आंदोलक तरुणाला सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये विजेचा धक्का बसला. सुदैवाने तो या घटनेतून तरुण बचावला आहे.
नवनाथ असं वीजेचा धक्का बसलेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला होता. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये असताना त्याला विजेचा धक्का बसला. मात्र, वेळीच त्याला वाचविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे सिडकोने आंदोलकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.