इंडि आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि

Sheetal Mharte : 'तुम्ही दिल्लीला गेलातं आणि झुकलातं'; शीतल म्हात्रेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून विविध बैठकांमध्ये सामील होत आहे. नुकतेच त्यांनी संसद भवनाला भेट दिली असून पक्षाच्या खासदारांशीही संवाद साधला. दरम्यान, इंडि आघाडीची महत्त्वाची बैठक काल, गुरुवारी दिल्ली पार पडली असून या बैठकीला काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संबोधित केले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी या घटक पक्षात उबाठा गट सामील झाला असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंसोबत सहाव्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळाले. यावर शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सडकून टीका केली असून बैठकीचा फोटो त्यांनी एक्स पोस्टवर शेअर केला आहे. 

हेही वाचा : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया ब्लॉकची महत्त्वपूर्ण बैठक; 25 पक्षांचे 50 नेते उपस्थित

शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे की, '"इंडि आघाडीत उद्धटराव, विश्वप्रवक्ते ,पेंग्विनची ही जागा...आता काही बोललं तर बोलणार की लायकी काढतात म्हणून …!!!', यासंबंधी शीतल म्हात्रे यांच्याशी संवाद साधला असता, ''गांधींनी ठाकरेंना जागा दाखवली. राहुलच्या भोजन बैठकीत उद्धव ठाकरे सहाव्या रांगेत. कमाल हासनच्याही मागे बसवले. तुम्ही दिल्लीला गेलात आणि तिथे झुकलात. तुम्हाला सहाव्या रांगेत बसवले म्हणजे तुमची जागा दाखवली आहे, हे सगळ्यांना दिसलं. त्यांच्या पुढे सगळे इंडि आघाडीचे नेते बसले होते. तुम्हाला मात्र शेवटच्या रांगेत बसवलं गेलयं. यावरूनच तुमची गरज संपत आलीए, हे दिसून येतं,'' असं त्यांनी म्हटलं आहे.