Amit Thackeray : 'लक्षात ठेवा, ते आपले बांधव आहेत'; मराठा आंदोलकांसाठी अमित ठाकरेंचं मनसैनिकांना खास आवाहन
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठे सीएसएमटी परिसरात एकवटले आहेत. त्यांच्या आंदोलनावर राजकीय वर्तृळातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच मनसे नेते अमित ठाकरेंनी मात्र त्यांच्या मूलभूत गरजांविषयीचा मुद्दा उपस्थित केला आहेत. त्यांनी एक्स पोस्ट करत मनसैनिकांना मराठा बांधवांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मराठा आंदोलक मुंबईत धडकताच सरकारनं सीएसएमटी स्थानकातील खाण्या-पिण्याची दुकानं बंद केली. त्यांनी वापरू करू नये, म्हणून शौचालयांना टाळं लावलं, सरकार आंदोलकांची कोंडी करू पाहत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात केला होता. त्यानंतर मराठा आंदोलकांसाठी पुणे, रायगड, नाशिक जिल्ह्यातून जेवण येऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनीही आंदोलकांची काळजी घेण्याकडे महाराष्ट्र सैनिकांचे लक्ष वेधले आहे. आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात आहेत. तो निर्णय होईल तेव्हा होईल. तोवर आंदोलकांना मुंबईत कोणत्याची प्रकारचा त्रास होता कामा नये, असे अमित ठाकरे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.