मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची

BEST Employees Society Election : बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान; ठाकरे बंधू विरूद्ध भाजपमध्ये लढत

मुंबई : मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आज पार पडणार आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल. तब्बल 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे पक्ष उत्कर्ष पॅनेल अंतर्गत निवडणूक लढवत आहेत. त्यामुळा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाच्या युतीचीही सुरूवात असल्याचे म्हटले जात आहेत. ठाकरे बंधूंची लढत भाजपच्या श्रमिक पॅनेल विरोधात होत आहे. 

हेही वाचा : CP Radhakrishnan: महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रमोशन; भूषवणार महत्वाचं 'हे' देशाचं पद

दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान पार पडणार आहे. यात ठाकरे बंधूंचे उत्कर्ष पॅनेल तर महायुतीच्यावतीने सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवण्यात आले असून यामध्ये प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदेंच्या सेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचा समावेश आहे. तसेच शशांक राव यांचा शशांक राव पॅनेल आणि मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा बेस्ट परिवर्तन पॅनेलदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे.