निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर शिवसेना (उद्धव ब
Aaditya Thackeray : 'हे मतांचं, निडणूक आयोगाचं सरकार'; आदित्य ठाकरेंचा भाजप सरकारला टोला
मुंबई : निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हे मतांचं सरकार आहे, हे निवडणूक आयोगाचं सरकार आहे, आता हे स्पष्ट झालं असल्याचं त्यांनी पत्रकांरांशी बोलताना म्हटलं आहे. यावेळी राज्यासह केंद्र सरकारवरही त्यांनी ताशेरे ओढले. मतांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रियेत घोळ घातला जात आहे. एकच व्यक्ती देशातील विविध ठिकाणी जाऊन मतदान करत आहे, अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळत आहे. याचे दाखले यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. शिवाय 15 ऑगस्ट रोजी मांसाहार करू नये, या शासनाच्या सक्तीवर आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवला आहे. कोणी काय खावे, हे ज्याचे त्याने ठरवावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. खाण्याच्या निवडीवर सरकारने अंकुश आणू नये, असेही त्यांनी नमूद केले.