Eknath Shide : शिंदेंची दिल्लीवारी निष्फळ; पालकमंत्रिपदावर वर्णी लावलेल्या भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांना ध्वजारोहणाचा मान
मुंबई : महायुतीत सर्वकाही आलबेल आहे, असे तिनही पक्षांच्या नेत्यांकडून बोलले जात असले, तरी चित्र मात्र वेगळेच दिसत आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील मंत्र्यांमध्ये विविध स्तरावर चढाओढ असल्याची पाहायला मिळत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळेच तर संशयाला आणखीनच वाव मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या आठवड्यात दिल्लीला जाऊन आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. एकनाथ शिंदेंचा हा गेल्या महिनाभरातील हा तिसरा दिल्ली दौरा होता. मात्र पहिल्या दोन दौऱ्यात गाठीभेटी न झालेल्या शिंदेंना अखेर या भेटीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटता आले. महायुतीत वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं, असा काही संकेत दिल्याचे या भेटीमागचे कारण समोर येत आहे.
हेही वाचा : Dharashiv Viral Video : अबब! तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मूर्तीवर फिरतोय उंदीर; मंदिर प्रशासनाचंही दुर्लक्ष?, भाविकांमध्ये नाराजी
कारणही तसेच आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्याजिल्ह्यात ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यानं जारी केली आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यासाठी भाजपच्या गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंकडे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांची गेल्याच वर्षी पालकमंत्रिपदावर वर्णी लावण्यात आली. पण शिंदेसेनेनं आक्षेप घेतल्यानंतर त्यांना स्थगिती देण्यात आली होती. परंतू पुन्हा याच दोन नेत्यांकडे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदेसेना नाराज असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी एप्रिल महिन्यात रायगडाला भेट दिली होती. किल्ल्यावरील शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी शाहांना तटकरेंनी त्यांच्या सुतारवाडीतील घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. शाहांनी आमंत्रण स्वीकारलं होतं. तटकरे यांच्या कन्या अदिती या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदार आहेत. सेनेचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. पण तरीही तटकरे पालकमंत्री झाल्या. पण शिंदेसेनेच्या आक्षेपामुळे त्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली.