अनिल अंबानी यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापेमारी केली आहे. मुंबई आणि दिल्लीतील 50 जागांवर ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती विशेष सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल अंबानींनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचीही माहिती मिळत आहे.
अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अनिल अंबानी समूहाविरुद्ध मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली जात आहे. देशभरात 35 पेक्षा जास्त ठिकाणांवर ईडीकडून छापे मारण्यात आले आहेत. अंबानी समूहाकडून बँक, गुंतवणूकदार, भागधारकांना हजारो कोटींचा गंडा घातला गेल्याचे ईडीने म्हटले आहे. अनिल अंबानींच्या कंपनीने येस बँकेच्या प्रवर्तकाला लाच दिल्याचे प्रकरणही उघड झाले आहे. येस बँकेने अनिल अंबनींच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जात गंभीर अनियमितता दिसून आली आहे. अनिल अंबानी समूहाने कर्जाच्या अटींचे उल्लंघन केलं. तसेच पैसे इतर कंपन्या आणि शेल कंपन्यांकडे वळवले असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सांगण्यात आले आहे.