बुलढाणा: बुलढाण्यात तरुणाला धर्म विचारुन मारहाण करण्यात आली आहे. यामुळे मागासवर्गीयांकडून आज खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच मागासवर्गीयांकडून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यात धर्म विचारुन दलित युवकास मारहाण केल्याप्रकरणी दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर शासन करण्यासाठी सोमवारी खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे. धर्म विचारून या युवकास मारहाण करणाऱ्या आतंकवाद्याविरोधात यूएपीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी पीडित युवकाची भेट घेतली आहे.
हेही वाचा: प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी सोडलं मौन; काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका तरुणाला धर्म विचारुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाय चोरीच्या संशयावरुन ही मारहाण करण्यात आली आहे. धर्म विचारुन तरुणाचे कपडे काढून तपासणी करण्यात आली. तो मुस्लिम तर नाही ना, हे तपासण्यात आले. त्यानंतर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे तरुणाच्या डोळ्याला मार लागला आहे आणि त्याच्या नाकाचे हाड मोडले आहे. यामुळे मागासवर्गीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात अद्याप पोलिसांनी यश मिळाले नाही. तरुणाना झालेल्या मारहाणीमुळे आज खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे. रोजचा रहदारीच्या रस्त्यावर आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
खामगावमध्ये तरुणाचा धर्म विचारुन मारहाण करण्यात आल्याने मागासवर्गीयांनी खामगाव बंदची हाक दिली आहे. यामुळे आज खामगावमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. खामगाव बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र आरोपींना पकडण्यात त्यांना यश मिळाले नाही.