Wednesday, August 20, 2025 02:05:20 PM

Buldhana Crime: प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या;हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बुलढाण्यात चाकूने वार करत तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणामुळे हत्या झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणात बुलढाणा पोलिसांकडून चार आरोप

buldhana crime प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्याहत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बुलढाणा: बुलढाण्यात चाकूने वार करत तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणामुळे हत्या झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणात बुलढाणा पोलिसांकडून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

तरुणाचा भरदिवसा झालेल्या खूनाचा थरारक व्हिडीओ
बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील ग्रीन लीफ हॉटेलजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत धामणदरी येथील 19 वर्षीय तरुण सनी सुरेश जाधव याची आरोपी देवराज माळी याने आपल्या इतर साथीदारासह चाकूने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बुलढाणा शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात 6 आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यानंतर बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी 2 पथके स्थापन करून घटनेच्या काही तासांतच मुख्य आरोपी देवराज संतोष माळीसह इतर 3 आरोपींना अटक करण्यात आले होते. या आरोपींना बुलढाणा कोर्टात हजर केले असता त्यांना 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सनीची हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. घटनास्थळी एका इमारतीत लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सनीच्या खुनाची संपूर्ण घटना कैद झाली असून सदर घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. 

हेही वाचा: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; लवकरच मिळू शकते आनंदाची बातमी

बुलढाणा शहरात एका तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या झाली आहे. विशेष म्हणजे भरदिवसा ही हत्या करण्यात आली आहे. 19 वर्षीय सनी जाधव याची हत्या आरोपी देवराज माळीने केली. देवराजने त्याच्या साथीदारांसोबत मिळून सनीचा खून केला. चाकूने वार करत सनीची हत्या करण्यात आली. भरदिवसा झालेल्या खुनाच्या घटनेमुळे बुलढाणा शहर हादरुन गेले. या घटनेनंतर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला. बुलाढाणा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रवी राठोड यांनी प्रकरणाचा कसून तपास केला. यानंतर मुख्य आरोपी देवराज माळीसह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणातील आरोपींना 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री