गोंदिया: गोंदिया देवरी येथील ट्रकचा अपघाताचा एक सीसीटीव्ही फुटेड समोर आला आहे. स्थानिक दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे अपघात झाला आहे.
देवरी येथील ट्रक अपघाताच्या एक नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. स्थानिक दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे अपघात झाला आहे. ट्रकमधील लोखंडी साखळी ट्रक चालकाच्या डोळ्यात घुसल्याने हा अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर नियमाचे पालन न करणाऱ्या लोखंडी साखळी वाहून येणाऱ्या ट्रॅक चालकावर कारवाई होते का?, हे पाहणं महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Shravan Somwar 2025 Horoscope: श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी मंगळ आणि शनीची युती, 'या' राशींनाच होणार फायदा
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील चेचीस ट्रक दुर्घटनेमधील एक नवा सीसीटीव्ही व्हिडीओ पुढे आला आहे. यामध्ये देवरी येथील स्थानिक दुकानातून ट्रक हा लोखंडी साखळी भरून रोड क्रॉस करत होता. या ट्रकच्या बाहेर लोखंडी साखळी होत्या. नागपूरकडून रायपुरकडे जात असलेल्या चेचिस ट्रक चालकाच्या डोळ्यात लोखंडी साखळी लागल्यामुळे हा अपघात झाला. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चेचीस ट्रक चालकाच्या डोळ्याला लागल्यामुळे हा ट्रक राष्ट्रीय महामार्ग ओलांडून रस्त्याच्या दुसरीकडे गेला. या अपघातामध्ये एका निरपराध जीव गेला असून चार लोक गंभीर जखमी झाले आहेत आणि एका चारचाकीसह काही दुकानाचे सुद्धा मोठे नुकसान झाले. आता नियमाचे पालन न करणाऱ्या या लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकांवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या सीसीटीव्ही व्हिडिओमुळे पोलिसांच्या भूमीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.