Thursday, August 21, 2025 02:52:35 AM

Ladki Bahin Yojana : सरकारला फसवणाऱ्या लाडक्या बहिणींचा पगार थांबवला; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. कारण सरकारने लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला आहे.

ladki bahin yojana  सरकारला फसवणाऱ्या लाडक्या बहिणींचा पगार थांबवला नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

मुंबई: मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. कारण सरकारने लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला आहे. सरकाने नोकरदार वर्गातील बोगस लाभार्थ्यांचे सरकारी वेतन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना सरकारने मोठा धक्का दिला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या दिवशीच बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठीची लाडकी बहीण योजना आता उलटणार आहे. याबाबत, ग्रामविकास विभागाने कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. तसेच, आता बोगस लाभार्थी म्हणून काम करणाऱ्या महिलांकडून पैसे वसूल केले जातील. इतकंच नाही, तर शिक्षा म्हणून पगार वाढ आणि पदोन्नती रोखण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Police Bharti 2025: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! 15 हजार 631 पोलीस भरतीला हिरवा कंदील; तरुणांना दिलासा
 

किती जणींवर होणार कारवाई?

महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या यादीमध्ये एकूण 1983 महिलांची नावे आहेत. या सर्व महिला जिल्हा परिषदांमध्ये काम करत आहेत. सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि कठोर कारवाईची तयारी केली आहे. 


सम्बन्धित सामग्री