मुंबई: अलिकडेच, बीसीसीआयने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी भारतीय संघाला पाठवल्याने देशभरात संतापाची साट उसळली आहे. अशातच, आमदार आदित्य ठाकरेंनी बुधवारी दुपारी 12:20 वाजता ट्विट करून बीसीसीआयवर टीका केली. ते म्हणाले की, 'बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा जास्त आहे का? ते आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा जास्त आहे का?', असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. या घटनेमुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: Wardha News : मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच कोसळलं स्मशानभूमीचं छत
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
'मागील काही दिवसांपासून, आपल्या देशाला आणि नागरिकांना वारंवार पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे आणि केंद्र सरकारनेही याबाबत सातत्याने सांगितले आहे. अलिकडेच, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असेही म्हटले की, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. मात्र, इतकं सगळं होऊनही बीसीसीआय दुर्दैवाने आणि निर्लज्जपणे आशिया कपमध्ये पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी भारतीय संघाला पाठवत आहेत. बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा वर आहे का? बीसीसीआय आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? बीसीसीआय पहलघममधील हल्ल्याचा सामना करणाऱ्यांच्या सिंदूरपेक्षा वर आहे का?', असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, 'भूतकाळात, मानवतेच्या हितासाठी अनेक राष्ट्रांना खेळांमध्ये एकटे पाडण्यात आले आहे. दहशतवाद हे एक कारण आहे, जे आपल्या दोन्ही राष्ट्रांना शांततेने प्रगती करण्यापासून रोखते. मात्र, तरीही बीसीसीआयच्या आग्रहामुळे आणि कदाचित पैशाच्या आणि जाहिरातींच्या कमाईच्या हव्यासामुळे, ते सिंदूर आणि त्यांच्या सैनिकांचे जीवन तुच्छ मानते. आम्ही जगभरात शिष्टमंडळे पाठवली, पहलगामच्या मागे पाकिस्तान आहे, असे म्हटले जात आहे. आता आम्ही क्रिकेट खेळत आहोत, याचे समर्थन करण्यासाठी जगभरात शिष्टमंडळे पाठवू का? हे खरोखरच लाजिरवाणे कृत्य आहे, जेव्हा पाकिस्तानने भारतासोबत हॉकी खेळण्यास नकार दिले आहे'.
सुरक्षेच्या कारणात्सव बीसीसीआय स्वत:च्या फायद्यासाठी पाकिस्तानविरोधात खेळते, असा दावाही भारताने केला आहे. मला आशा आहे की, जरी आपण राजकारणाच्या वेगवेगळ्या बाजूंनी असलो तरी, ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूरदरम्यान आपण आपल्या आदरणीय पंतप्रधानांना पाठिंबा दिला होता, तसेच, या विचारावर आपण एकाच पानावर असू', अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.