प्रमोद पाणबुडे. प्रतिनिधी. वर्धा: वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीचं छत कोसळलं. या घटनेमुळे, स्मशानभूमी परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
हेही वाचा: Maharashtra Weather Update : पावसाचा जोर कमी, तरी काळजीचं आवाहन; राज्यातील 'या' जिल्ह्यांना अजूनही रेड अलर्ट जारी
नेमकं प्रकरण काय?
ही घटना वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील साखरा गावात घडली. अजब मारुती बुदे यांचं निधन झाल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली. यानंतर, विधीवत अंत्यसंस्कार सुरू झाले आणि मृतदेहाला सरणावर ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. तेवढ्यातच, स्मशानभूमीचं छत कोसळलं . या घटनेमुळे, स्मशानभूमी परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.