Wednesday, August 20, 2025 10:47:43 PM

BEST Election 2025 : 'जनतेने त्यांना नाकारले'; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

सोमवारी मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक (BEST Election 2025) पार पडली. या निवडणूकीसाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती.

best election 2025  जनतेने त्यांना नाकारले मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

मुंबई: सोमवारी मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक (BEST Election 2025) पार पडली. या निवडणूकीसाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती. मंगळवारी उशीरा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तब्बल अनेक दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने या सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागून होते. 

मात्र, या निवडणूकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. यावर, जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, 'पतपेढीच्या निवडणूकांचे राजकारण करू नये. परंतु, ठाकरे बंधूंनी त्याचे राजकारण केले. शशांक आणि प्रसाद लाड हे आमचे नेते आहेत. पण आम्ही त्याचे राजकारण केले नाही'. 

फडणवीसांनी लगावला ठाकरे बंधूंना टोला

जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारला, तेव्हा ते म्हणाले की, 'माझे असे मत होते की, अशाप्रकारच्या पतपेढीच्या निवडणूकीचे राजकीयकरण  करू नये. परंतु, ठाकरे बंधूंनी त्याचे राजकारण केले. शशांक आणि प्रसाद लाड हे आमचे नेते आहेत. पण आम्ही त्याचे राजकारण केले नाही'. 

पुढे, फडणवीस म्हणाले की, 'आता ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. अशातच, ठाकरे ब्रॅंड निवडून आणण्यासाठी ठाकरे बंधूंनी राजकारण केले आहे. मात्र, कदाचित ठाकरे बंधूंना एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे, ठाकरे बंधूंना एकही जागा मिळाली नाही'. 


सम्बन्धित सामग्री